शहादा l प्रतिनिधी
येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शारदा कन्या माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शालांत दहावीच्या परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या तसेच इतर गुणवंत विद्यार्थिनींचा विद्यालयातर्फे गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव, सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती वर्षा जाधव, संस्थेचे समन्वयक संजय राजपूत, मुख्याध्यापिका श्रीमती एस.झेड. सैय्यद पर्यवेक्षक एन.बी.कोते,
पालक नरेंद्र बागले सह अन्य पालक उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थिनी राठोड रिंकू राधूसिंग द्वितीय आलेली मयुरी नरेंद्र बागले व तृतीय आलेली भाग्यश्री कैलास भोई यांच्या व पालकांच्या शैक्षणिक साहित्य, स्नेहवस्त्र देऊन सन्मान केला.
याव्यतिरिक्त गांधी विचार संस्कार परीक्षेत जिल्ह्यात प्रथम सुवर्णपदक मिळवणारी हिना अयुब मन्यार रौप्य पदक मिळवणारी तनजुम सादिक खत्री यांचाही सन्मान केला.तर बारावीत प्रथम आलेली मिसबा इक्बाल पिंजारी द्वितीय आलेली कुमारी हिना कौसर मन्यार तृतीय आलेली भाग्यश्री कैलास भोई यांच्या देखील शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान केला.
यावेळी पालक नरेंद्र बागले,मुख्याध्यापिका श्रीमती एस.झेड.सैय्यद यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस.एस.मोरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.