Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळा १७ ऑगस्टपासून उघडण्याचा निर्णय अखेर रद्द

team by team
August 12, 2021
in राज्य
1

नंदुरबार | प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा येत्या १७ ऑगस्टपासून उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होतो . शालेय शिक्षण विभागाने  घेतलेल्या या निर्णयास आता राज्य शासनाने स्थगिती दिली आहे .
राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते ७ वी आणि शहरी भागातील ८ वी ते इयत्ता १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली होती . मात्र त्यावर निर्णय घेण्यासाठी आज टास्क फोर्सची  बैठक घेण्यात आली . या बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णयास स्थगिती दिली आहे .
मुंबई उपनगर , ठाणे शहरातील कोरोना परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांना अधिकार दिले होते . राज्य सरकारने २ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या ब्रेक द चेन मधील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार कोल्हापूर , सांगली , सातारा , सोलापूर , पुणे , नगर , बीड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड , पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्हाधिकार्‍यांना अधिकार दिले होते . महापालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे . या समितीमध्ये प्रभाग अधिकारी , पालिकेचे वैद्यकीय अधिकार आणि शिक्षण अधिकारी यांचा समावेश असणार आहे .एका वर्गात २० विद्यार्थी कोरोना संबंधित नियमांचे काटेकोर पालन करून शाळा सुरु करण्यास परवानगी देताना जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रात भरतील . एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असतील . दोन बाकांध्ये सहा फूट अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत . विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक राहणार नाही . पूर्णपणे पालकांच्या समंतीने विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकतात , असे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे . ज्या शाळा सुरू होतील अशा संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो शाळेच्याच शहरात किंवा गावात करावी . शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये , असे सूचनेत नमूद केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

ब्रेक द चेन अंतर्गत नवे आदेश जारी :राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० वाजे पर्यंत सुरु राहणार

Next Post

समृद्ध गाव स्पर्धेतील या गावांचा जिल्हाधिकारी करणार सन्मान

Next Post
समृद्ध गाव स्पर्धेतील या गावांचा जिल्हाधिकारी करणार सन्मान

समृद्ध गाव स्पर्धेतील या गावांचा जिल्हाधिकारी करणार सन्मान

Comments 1

  1. Umesh Chaudhari says:
    4 years ago

    Hello mahesh bhai jay yogeshwar

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add