नंदुरबार ! प्रतिनिधी
पानी फाऊंडेशन आयोजित समृद्ध गाव स्पर्धेत नंदूरबार तालुक्यातील १२ गावांनी उकृष्ठ कामगिरी केली आहे,या गावाच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी केली आहे,या गावांना जिल्हास्तरावरून जिल्हाधिकारी सन्मानित करणार आहेत.
वॉटर कप स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर आलेल्या पाण्याचे समृद्धी मध्ये रूपांतर करण्यासाठी पाणी फाऊंडेशन कडून तालुक्यात समृद्ध गाव स्पर्धा राबविण्यात येत आहे, या स्पर्धेत पाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे,सोबतच मृदा व जलसंधारण, गावातील प्रत्येक कुटुंबाचे आर्थीक उत्पन वाढवणे,लखपती किसान, पौष्टिक गवताची संरक्षित कूरणक्षेत्र तयार करणे, वृक्ष व जंगल यांची वाढ करणे या विषयावर लक्ष केंद्रित केले आहे, गावातील जैवविविधता,निसर्ग जपला तरच गावाला समृद्ध होता येता येईल,यासाठी या स्पर्धेत गुण देण्यात आले आहेत,पहिल्या टप्प्यात १२० गुणांची कामे पूर्ण करणार्या गावाचा सन्मान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे हस्ते आसाने या गावी करण्यात येणार आहे, या सोहळ्यासाठी प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी व गावकरी उपस्थित राहणार आहेत.
या गावाचा होनार सन्मान
या स्पर्धेत या गावांचा सन्मान करण्यात येणार आहे, आसाने,बलदाने,न्याहाली,वावद , उमर्दे खूर्दे,
कार्ली,धमडाई,जळखे, रनाळे खुर्द, केसरपाडा, बिलाडी.बह्याने