नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्यात कोविड -१ ९ ची दुसरी लाट आटोक्यात येत आहे . परंतु अद्यापही कोविड रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे .त्यानुसार ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
यात
१ ) उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे . Q उपरोक्तनुसार उपहारगृहे / बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री १० वा . पर्यंत मुभा देण्यात येत आहे .
२ ) दुकाने : राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री १० वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
३ ) शॉपिंग मॉल्स : राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री १० वा . पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
४ ) जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून – स्पा : अ ) वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम , योगसेंटर , सलून – स्पा ५० टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री १० वा . पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
५ ) राज्यातील सर्व मैदाने , उद्याने , चौपाटया , समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील ,
६ ) विवाह सोहळे : खुल्या प्रांगणातील, लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे .
खुल्या प्रांगण, लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल . का बंदिस्त मंगल कार्यालय ,हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल . मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल . या निबंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल .
७ ) सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : राज्यात सिनेमागृह / नाट्यगृह , मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील .
८ ) धार्मिक स्थळे : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यत नागरिकांसाठी बंद राहतील .
९ ) आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना , बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल , अन्य प्रवाशांसाठी ७२ तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहिल . १० ) कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा . सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे . यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस , राजकीय , धार्मिक , सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम , निवडणूक प्रचार सभा , रॅली , मोर्चे , इ . वरील निबंध कायम राहतील .
१२) मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने , जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन ७०० मे . टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करुन त्यानुसार कठोर निबंध लागू करण्यात येतील .
१३ ) राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की , मास्कचा वापर , हातांची स्वच्छता , शारिरीक अंतराचे पालन , इतरत्र थुकण्यास प्रतिबंध , इ . सर्व निर्वधांचे पालन करणे अनिवार्य राहिल .
हा आदेश दि . १५ ऑगस्ट , २०२१ पासून अंमलात येतील .असे आदेशात म्हटले आहे.सदरचा आदेशावर मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी आहे.