Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर गाडी सोडून पळणाऱ्या रेशन मालाची चोरटी वाहतूक प्रकरणी गुन्हा

team by team
August 8, 2021
in क्राईम
0
गावकर्‍यांनी पाठलाग करतात रेशन दुकानदार गाडी टाकुन फरार,पुरवठा विभाग कारवाई कधी करणार नागरीकांचा सवाल
तळोदा ! प्रतिनिधी
              रेशनच्या माल काळया बाजारात घेवून जाणाऱ्या गाडीस तळोदा तालुक्यातील अक्रानी येथील गावकऱ्यांनी पकडून महसूल प्रशासनाचा स्वाधीन केली.पुरवठा विभागाने चौकशी केल्या नंतर मालासह गाडी जप्त केली.त्यात रेशनिंगचे २३ हजार रुपयांचे गव्हाचे कट्टे आढळून आल्याने तळोदा पोलिसात दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील अक्रानी येथील नागरिकांनी शुक्रवारी रात्री साडे बारा वाजे नंतर वाहन ( क्र. एम.एच.१७, ए. ए.११५३) ही गाडी शासकीय बारदान मधून ५० किलो वजनाचे गव्हाचे कट्टे अक्राणी  येथून खामला गावाकडे जात असताना दिसून आली.तेव्हा गावकऱ्यांनी देखील वाहनचालक यास गाडी थांबविण्याचे सांगितले परंतू त्याने थांबविण्यास नकार दिला.त्यामुळे गावकऱ्यांनी ही तिचा पाठलाग केला. वाहनचालक कालुसिंग वळवी याने वेगात वाहन चालवत असताना त्याचाही गाडीवरील ताबा सुटला.शेवटी ही गाडी गावापासून जवळच असलेल्या दरीत अडकली.त्यानंतर गावकऱ्यांनी सकाळी महसूल प्रशासनास ही माहिती दिली.पुरवठा शाखेचे निरीक्षक संदीप परदेशी यांनी घटना स्थळी भेट देवून गाडीतील मालाची खात्री केली.त्यात रेशनिग चा माल असल्याचे आढळून आले.गाडीत २३ हजार रुपये किमतीचे साडे अकरा क्विंटल रेशनिंग चे गहू होते.महसूल प्रशासनाने मलासह गाडी जप्त केली आहे.पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी यांच्या दोघांविरुद्ध तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान वाहनचालक काळूसिंग वळवी हा वाहन सोडून फरार झाला आहे.    अक्रानी येथील रेशन दुकानं हे गावातीलच महिला बचत गटाच्या मार्फत चालविण्यात येत आहे.सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी यांनी दुकानास त्याच दिवशी भेट दिली होती.त्यावेळी दुकानदार रमाकाबाई रमेश ठाकरे यांनी तपासणी कामी दप्तर उपलब्ध करून देण्यास स्पष्ट नकार दिला होता.त्यामुळे प्रशासनास दप्तर तपासणी करता आले नसल्याचे सांगण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव व तळोदा तालुक्यातील काही भागात जाणवले भुकंपाचे सौम्य धक्के

Next Post

कुपोषण कमी करण्यासाठी स्थानिक भाषेत जनजागृती करा-ॲड. यशोमती ठाकूर

Next Post
कुपोषण कमी करण्यासाठी स्थानिक भाषेत जनजागृती करा-ॲड. यशोमती ठाकूर

कुपोषण कमी करण्यासाठी स्थानिक भाषेत जनजागृती करा-ॲड. यशोमती ठाकूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add