Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जनताच राजकीय नेत्यांना निवृत्त करू शकते : माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
April 2, 2022
in शैक्षणिक
0
जनताच राजकीय नेत्यांना निवृत्त करू शकते :  माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
कर्मचारी खरचं भाग्यवान आहेत की त्यांच्या सेवानिवृत्त समारंभ होत असतो. परंतु, आमच्या सारख्या राजकीय नेत्यांच्या सेवापुर्ती समारंभ होत नाही. नेते कधी निवृत्त होऊन जातील याच्या भरोसा नसतो. जनता जनार्दनात एवढी ताकद आहे की त्यांनी ठरवलं तर नेत्यांना रात्रीतून निवृत्त करू शकतात असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार तालुका विधायक समितीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त समारंभाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी माजी आ.तथा संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस यशवंत पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, समन्वयक डॉ.एम.एस रघुवंशी, प्राचार्य डॉ.व्ही.एस श्रीवास्तव, उपप्राचार्य डॉ एम.जे रघुवंशी, प्रा.डॉ एम.एस रघुवंशी, प्रा एन.जे सोमानी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, उपाध्यक्ष मनोज रघुवंशी व सरचिटणीस यशवंत पाटील यांच्या हस्ते प्रा.डॉ.राजेंद्र कासार,प्रा.अशोक शेवाळे, प्रा.विलास अहिरराव प्रा.सुनिल चौधरी,राजेंद्र भाऊराव पाटील,दिनेश रघुवंशी,देविदास वाघ,महादू भिमाजी गवळी,सुरेश साळवे,मालचंद्र चौधरी,प्रा.डॉ.अरविंद देसले या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधव कदम तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ.यु.जे धगधगे यांनी केले.
प्रेरणेचे प्रकाशन
संस्थेच्या जीटीपी महाविद्यालयाच्या प्रेरणा नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेरणा नियतकालिका महाविद्यालयीन युवकांच्या विचार,जाणिवा, संवेदना, भावना,दृष्टिकोन,अनुभव इत्यादींच्या उत्स्फूर्त आविष्कारास संधी देणारे एक महत्त्वपूर्ण विचार विचार मंच असून सोबतच महाविद्यालयात संपन्न होत असलेल्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या घटनाक्रम हे त्यातून प्रतिबिंबित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

डोंगरगाव शिवारात एका झाडावर गळफास घेतलेल्या दोन्ही तरुणांची ओळख पटली,त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Next Post

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

Next Post
महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add