Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात सर्रासपणे सुरु असलेल्या गुटखा विक्री व साठवणूकीवर कारवाई करावी : मनसेची मागणी

team by team
March 30, 2022
in क्राईम
0
नंदुरबारात सर्रासपणे सुरु असलेल्या गुटखा विक्री व साठवणूकीवर कारवाई करावी : मनसेची मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार- महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंद असतांना देखील नंदुरबार जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. गुजरात राज्यातून विमल गुटखा आणून नंदुरबारात गोडावुनमध्ये साठवणुक केला जात आहे. शासनाच्या नियमांना तिलांंजली देवुन सर्रासपणे होणार्‍या विमल गुटख्या विक्रीवर कारवाई करुन प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व अन्न-औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासुन विमल गुटख्यांची तस्करी व विक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री व साठवणुकीला प्रतिबंध असतांना देखील गुजरात राज्यातील निझर येथुन गुटखा आणून नंदुरबार शहरात बेकायदेशीर रित्या साठवणुक केला जात आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी खुलेआम गुटखा विक्री सर्रासपणे सुरु आहे. नंदुरबारातील बहुचर्चित व्यापारी हा निझर येथून गुटखा आणून शहरात पुरवठा करीत आहे. यामुळे शहरातील सिंधी कॉलनी, दोशाह तकीया, नेहरु चौक, मनियार मोहल्ला, मारवाडी गल्ली गांधी नगर, अमर टॉकीज याठिकाणी गुटखा तस्करी सर्रासपणे सुरु आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष दिसुन येत असून गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. म्हणुन सदर गुटखा विक्रीवर कारवाई करुन प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनिल कोकणी, प्रसिध्दी प्रमुख कल्पेश माळी, संतोष पेंढारकर आदींनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

Next Post

कोंडाईबारी घाटात ट्राला नादुरुस्त झाल्याने 5 तास वाहतूक ठप्प

Next Post
कोंडाईबारी घाटात ट्राला  नादुरुस्त झाल्याने 5 तास वाहतूक ठप्प

कोंडाईबारी घाटात ट्राला नादुरुस्त झाल्याने 5 तास वाहतूक ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add