Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माय चाईल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा वाणी यांचा सक्षम महिला रत्न पुरस्काराने सन्मान

team by team
March 22, 2022
in शैक्षणिक
0
माय चाईल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा वाणी यांचा सक्षम महिला रत्न पुरस्काराने सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा मयुर वाणी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सक्षम महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सक्षम महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे खानदेशातील आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा मयूर वाणी यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सक्षम महिला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पूजा वाणी या माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम राबवित आहे. यासाठी त्यांचे पती मयूर वाणी व कुटुंबीयांची विशेष साथ लाभत आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस असल्याने पूजा वाणी या माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवित व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून गोरगरीब व मुलांना मदतीचा हात देत आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ही कार्य केले जात आहे. पुणे येथील शिवाजीनगरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय सक्षम महिलारत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नंदुरबारच्या पूजा मयूर वाणी यांचा राज्यस्तरीय सक्षम महिलारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी आमदार तथा साहित्यिक उल्हास पवार, मोहन जोशी, अभिनेत्री निशा परुळेकर, सविता जामनिक , ज्येष्ठ समाजसेविका कमलबाई परदेशी, सक्षम महिला रत्न पुरस्कार वितरणचे आयोजक विलास पाटील आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पूजा वाणी यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

7 वर्ष 11 महिन्यांच्या अंशुल ने केले आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर सर करीत फडकवला किलीमांजारो शिखरावर तिरंगा

Next Post

शेतकर्‍यांचे नवीन रोहित्र प्रस्ताव आ.राजेश पाडवी यांनी केले अधिकार्‍यांना सुपूर्त

Next Post
शेतकर्‍यांचे नवीन रोहित्र प्रस्ताव आ.राजेश पाडवी यांनी केले अधिकार्‍यांना सुपूर्त

शेतकर्‍यांचे नवीन रोहित्र प्रस्ताव आ.राजेश पाडवी यांनी केले अधिकार्‍यांना सुपूर्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add