Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील 10 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश

team by team
June 22, 2021
in राज्य
0
जिल्ह्यातील 10 हजार कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश

नंदुरबार .

ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानांतर्गत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील 10 हजार 431 लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात घराची चावी देण्यात आली.

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दूरदृष्यप्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आणि प्रकल्प संचालक प्रदीप लाटे उपस्थित होते.

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2020 ते 5 जून 2021 या कालावधीत राबविलेल्या गेलेल्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 10 हजार 431 नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले. आज झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे वेळी प्रातिनिधीक स्वरुपात 5 लाभाथ्यांना घराच्या किल्ल्या देण्यात आल्या. तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवरदेखील प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घरकुलाची चावी देण्यात आली.

महा आवास अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 9616 घरकुले अभियान कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आले. तसेच राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत एकूण 819 लाभार्थ्यांचे घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले.

आज राज्यपातळीवर एकाच दिवशी हा ई-गृहप्रवेश कार्यक्रम दूरदृश्यप्रणालीद्वारे पार पडला. राज्यात या अभियान काळात पूर्ण झालेल्या सुमारे 3 लाख 23 हजार घरांचा ताबा संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला.
—

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारच्या पालकमंत्र्यांनी शिवसैनीकांशी संघर्ष करण्यापेक्षा समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करावा

Next Post

बिलगाव आरोग्य केंद्रात पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी सहकार्य-ॲड.के.सी.पाडवी

Next Post
बिलगाव आरोग्य केंद्रात पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी सहकार्य-ॲड.के.सी.पाडवी

बिलगाव आरोग्य केंद्रात पाण्याची कायमस्वरूपी सुविधा करण्यासाठी सहकार्य-ॲड.के.सी.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add