नवापूर l प्रतिनिधी
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात बाबा जय गुरुदेव यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी परमसंत बाबा उमाकांतजी महाराजांच्या प्रेरणेने नशा मुक्ति व शाकाहारी संमेलन मेळावा व प्रदर्शन भरविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात जय गुरुदेव बाबा संस्थानच्या माध्यमातून नशा मुक्ती तसेच 432 प्रकारच्या पदार्थांचे शुद्ध शाकाहारी प्रदर्शनी भरविण्यात आले होते. या संमेलन मेळावा व प्रदर्शनीचे उद्घाटन बीएपीएस स्वामीनारायण संस्था उकइ गुजराथ राज्याचे संत परमपूज्य शुभदर्शन स्वामीजी महाराज, योगेश स्वामीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात गहू, तांदूळ, बेसन यासह शुद्ध शाकाहारी असे 432 पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.जय गुरुदेव सत्संग महाराष्ट्राचे मुरलीधर कडू, उज्जैन आश्रमचे अभिषेक लीलोरे,गणेश पाटील, ॲड. नितीन देसाई,धर्मेंद्र पाटील, आनंद खैरकर,धाकु मोरे, विश्वनाथ पाटील, किशोर चौधरी नितेश चौधरी, प्रभाकर चौधरी ,संदीप पारेख, संदीप पाटील, महेंद्र जाधव ,कमलेश मीना,कमलेश पाटील, आदी उपस्थित होते या संमेलन मेळाव्यात आलेल्या नागरिकांना नशा मुक्ती संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील,नगरसेविका अरुणा पाटील,मिनल लोहार,शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,माजी नगरसेवक अजय पाटील उपस्थित होते.या प्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या नंतर दुपारी १ वाजता सत्संगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या संसगा मध्ये उज्जैन येथील अभिषेक लिल्होरे म्हणाले की गाय,हत्ती,बैल हे प्राणी शाकाहारी आहे त्यांच प्रमाणे माणसाने सुध्दा शाकाहारी राहीले पाहीजे.सर्व जिवाना जगण्याचा अधिकार पमेश्वराने दिला आहे.मास खाल्याने पुजा पाठ व्यर्थ आहे.मासाहार ,नशा केल्याने मानवाची बुध्दी भ्रष्ट होते.मासाहार केल्याने असंख्य मोठे आजार मानवाला होत आहे.अंडा खाल्याने डायबिटीस,दमा सारखे आजार होत असतात.बाबा जयगुरुदेव यांनी सांगितले आहे की मासाहार मानवाने सोडले नाही तर कोरोना पेक्षा ही भय़ंकर अशी बिमारी येऊन गांवाचे गावे संपुष्टात येतील.प्रत्येक परीवाराने संगठीतपणे राहणे गरजचे आहे. आजचा युगामध्ये मुल- बापला होत नाही.संस्कार शिस्त बिघडली आहे.हिंसा वाढत आहे याच कारण मासाहार,नशा आहे.असे सांगितले.या सत्संग मध्ये नवापूर तालुक्यातील असंख्य भाविक उपस्थित होते.










