नंदुरबार | प्रतिनिधी
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्याने नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आनंदोत्सव साजरा करीत जल्लोष करण्यात आला.
नंदुरबार येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केल्याने नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आनंदोत्सव साजरा करीत जल्लोष करण्यात आला.यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक यांनी सांगीतले की, केंद्र सरकारने शेतकर्यां विरोधात जे ३ कृषी कायदे लावून शेतकर्यांवर जो अन्यायाचा डोंगर उभा केला होता.ते तीन कृषी काळे कायदे काल रद्द केले गेले. यामुळे नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आनंदोत्सव जल्लोष साजरा करण्यात आला सर्व शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.असे सांगीतले.यावेळी नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा प्रभारी जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक इकबाल खाटीक, शांतीलाल पाटील, एजाज बागवान, खंडेराव पवार, दिलावर शहा ,रहुफ शहा, हाजी युनीस, हाजी असलम, भास्कर सोनवणे, टी.आर.खान , शमा शेख, प्रवीण लोहार, दत्तू पवार आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.