Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे, आदिवासी विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

team by team
November 4, 2021
in सामाजिक
0
राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे, आदिवासी विद्यार्थी संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन

नवापूर l प्रतिनिधी
नॅशनल हायवे नं.६ चे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले जात असल्याबाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर.सी. गावीत व पदधिकारी यांनी तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले आहे.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की नवापूर तालुक्यातून जाणारा महामार्ग क्रं ६ चे काम सुरु असून सदर काम हे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले जात आहे.रायंगण नदीवरील पुलाचे बांधकाम सुरु आहे.सदर पुलावर स्लॅबचे काम सुरु होते.निकृष्ठ दर्जाचे काम असल्यामुळे सदर पुलाचा स्लॅब अचानक कोसळला सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.नवापूर तालुक्यात सुरु असलेले हे महामार्गाचे काम हे शासनाच्या नियमानुसार होत नसून खडी टाकल्यानंतर त्याच्यावर पाणी टाकले जात नाही तसेच रोलवर फिरवला जात नाही व लगेच त्याच्यावर डांबरीकरण केले जाते.त्यामुळे काही दिवसानंतर रस्त्याला तडे पडलेले आहे.अतिभाराचे वाहतूक वाहन गेल्यानंतर रस्ता लगेच खराब होईल.तसेच काही ठिकाणी काळी माती न काढता रस्त्यावरुन काढलेले डांबर व खडया तश्याच टाकलेले आहेत.त्यामुळे शासनाचे नियम धाब्यावर बसवून कंपनी मनमानीचे निकृष्ठ दर्जाचे काम करीत आहे.रायंगण येथील पुल कोसळया त्यावरुन शासनाचे इंजिनीयर, अधिकारी यांचे लक्ष सदर कामात नसल्याचे दिसते.सदर पुलाचे कामामध्ये रेती वापरली गेलेली नाही.केमिकल वस्तूंचा वापर जास्त झाल्यामुळे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने सदर पुल कोसळला.तरी सुध्दा शासनाचे अधिका-यांचे निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने सदर पुल कोसळला तरी सुध्दा शासनाचे अधिका-यांचे लक्ष सदर पुलाचा स्लॅब का पडला? याची सखोल चौकशी व्हावी व निकृष्ठ दर्जाचे काम बंद करावे व शासनाचे संपूर्ण कामामध्ये लक्ष ठेवावे अन्यथा निकृष्ठ दर्जाचे कामामुळे जिवितहानी होऊ शकते.सदर प्रकरणाची संपूर्णपणे चौकशी करुन कंञाटदारावर कारवाई करावी व शासनाच्या नियमानुसार काम करण्यात यावे अन्यथा सदर काम बंद पाडण्यात येईल व होणा-या परीणामास सर्वस्वी शासन जवाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर. सी .गावीत,दिलीप गावीत,गुलाब गावीत,अनिल गावीत,,रमेश गावीत,शमुवेल गावीत,प्रशांत गावीत,प्रविन गावीत,करणसिंग गावीत आदीचा सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

चिनोदा चौफुलीला जननायक तंट्या मामा भील नाव द्या : बिरसा फायटर्स

Next Post

प्रांतपाल ला.दिलीप मोदी यांची लायन्स परिवाराच्या सेवा प्रकल्पास भेट

Next Post
प्रांतपाल ला.दिलीप मोदी यांची लायन्स परिवाराच्या सेवा प्रकल्पास भेट

प्रांतपाल ला.दिलीप मोदी यांची लायन्स परिवाराच्या सेवा प्रकल्पास भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add