Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

team by team
August 7, 2026
in राजकीय
0
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

नंदुरबार l प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जमाती (ST) मोर्चाची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित यांची प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. यामुळे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पार्टी अनुसुचित जमाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार(गडचिरोली) डॉ. देवराव एम. होळी आणि अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा आमदार योगेश सागर यांनी ही प्रदेश कार्यकारिणी घोषित केली असून डॉक्टर सुप्रियाताई गावित यांना निवड केल्याचे पत्र दिले आहे. मराठवाडा, विदर्भ, ठाणे, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागातून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर एकूण 8 उपाध्यक्ष निवड करण्यात आले आहेत. डॉक्टर सुप्रिया गावित यांची उत्तर महाराष्ट्रातून प्रदेश कार्यकारिणीवर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याबद्दल उत्तर महाराष्ट्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून डॉक्टर सुप्रिया गावित यांचे अभिनंदन करण्यात आले.

दरम्यान, नंदुरबार येथील खोडाई माता रोड वरील निवासस्थानी भेट घेऊन जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील स्वागत आणि सत्कार करीत डॉक्टर सुप्रिया गावित व माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला. याप्रसंगी नंदुरबार, अक्कलकुवा, धडगाव, शहादा, तळोदा या सर्व तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर सुप्रिया गावित या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ कुमुदिनी गावित यांच्या कन्या आहेत, तर माजी खासदार संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांच्या लहान भगिनी आहेत. डॉ.
यांनी डॉ.विजयकुमार गावित व डॉक्टर हिना गावित यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असताना उल्लेखनीय कार्य केलेले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट

Next Post

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

Next Post
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add