Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

team by team
August 6, 2026
in राजकीय
0
रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

अपघात आणि प्रसुती सारख्या प्रसंगात आवश्यक असलेले रक्त उपलब्ध न होण्याच्या घटनांना आदिवासी समाज प्रामुख्याने सामोरा जात असतो. या पार्श्वभूमीवर आदिवासी दिनाचे औचित्य साधून रक्तदानाचे उपक्रम घेण्यात येत आहेत, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. दुर्गम भागात ब्लड बँक नाही त्यामुळे मी खासदार असताना केंद्र सरकारला विनंती करून अक्कलकुवा, धडगाव आणि मोलगी येथील रुग्णालयांमध्ये रक्त संचय केंद्र कार्यान्वित करण्याची मंजुरी मिळवली होती. अशा स्वरूपात यापुढेही रक्त दानाला वेग येण्यासाठी आपण पाठपुरावा करत राहू; असे प्रतिपादन माजी खासदार संसद रत्न डॉ. हिना गावित यांनी केले.

विश्व आदिवासी गौरव दिवसाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कै. दिलबरसिंग पाडवी नगरात माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिराचा शुभारंभ पार पडला. त्याप्रसंगी डॉक्टर हिना गावीत बोलत होत्या. श्री विद्या विकास संस्था वाण्याविहीर संचलित सातपुडा वैभव विद्यालय व क. कला महाविद्यालय, वाण्याविहीर, श्री अश्वत्थामा माध्यमिक विद्यालय, ब्रि. अंकुशविहीर आणि जनकाल्याण ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले. भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नागेश पाडवी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप वसावे, माजी सभापती किरसिंग वसावे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष नितेश वळवी, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अर्जुन पटले, पंचायत समितीचे माजी सदस्य ॲड.सुधीर पाडवी, अशोक राऊत, रायसिंग वळवी, धनसिंग दादा, विनोद कामे आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आदिवासी दिनाचे औचित्य साधून फक्त नाच गाणे मिरवणुका आयोजित करण्याऐवजी रक्तदानासारख्या उपक्रमांना प्राधान्य देऊन आदिवासी समाजाला नव्या प्रवाहात आणण्याची अत्यंत गरज आहे. आदिवासी समाजातील स्त्री-पुरुषांनी रक्तदानाबद्दलचे गैरसमज दूर करावे. मोठ्या संख्येने रक्तदानाच्या महत्वपूर्ण कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर हिना गावित यांनी केले. सिकलसेल ॲनिमिया या भागातून नष्ट व्हावा या दृष्टिकोनातून सुद्धा वेळच्या वेळी रक्त तपासणी होणे आणि शक्य असेल त्यांनी रक्तदान करणे काळाची गरज आहे. सर्व गावांमधील सरपंच पदाधिकारी कार्यकर्ते आणि वैद्यकीय विभागाशी संबंधितांनी याविषयी जागृती घडवावी; असे देखील आवाहन त्यांनी केले.

नागेश पाडवी यांनी प्रास्ताविक करताना रक्तदानाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. किरसिंग वसावे यांनी दुर्गम भागातील रक्तदानाची गरज व्यक्त केली. तर पोलीस निरीक्षक पटले यांनी रक्तदानासाठी युवा वर्गाने मोठ्या संख्येने पुढे यावे असे आवाहन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Next Post

कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

Next Post
कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026
शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट

शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांची भेट

August 6, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याचा नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबतच्या वक्तव्याचा नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध

August 6, 2026
तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

तोरणमाळ पर्यटन विकास आराखड्याच्या मंजुरीसाठी पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

August 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add