Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

team by team
August 3, 2026
in शैक्षणिक
0
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी-

पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक व लोकजागृतीच्या कार्याचा प्रभावीपणे आढावा घेतला.
वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या ओघवत्या वाणीने उपस्थितांची मने जिंकली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या लोकमान्य टिळकांच्या विचारांचा तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी व परिवर्तनवादी विचारांचा विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून जागर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील होते. संदीप इशी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महान व्यक्तिमत्त्वांचे विचार आत्मसात करून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले.
वकृत्व स्पर्धेचे परीक्षण विद्या पाडवी यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेद्र बांगर यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

Next Post

रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

Next Post
रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add