Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

team by team
August 6, 2026
in क्राईम
0
कॉलेज परिसरात तलवार व कुकरी बाळगून फिरणारा इसम जेरबंद

 

नंदुरबार l प्रतिनिधी-

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात झाशीची राणी पथक व दुर्गाशक्ती पथक ही विशेष महिला पथके कार्यरत आहेत.

दोन्ही पथकांमध्ये प्रत्येकी एक महिला पोलीस अधिकारी व १३ महिला पोलीस अंमलदारांचा समावेश असून, शाळा, महाविद्यालये, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणे तसेच गर्दीच्या परिसरात साध्या वेशात नियमित गस्त घालून टवाळखोरी, महिलांची छेडछाड, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, संशयास्पद हालचाली तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.

दि. ०३ ऑगस्ट २०२६ रोजी जी.टी.पी. कॉलेज परिसरात नियमित गस्तीदरम्यान पथकांना एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे सोनेरी मूठ असलेली मध्यम आकाराची लोखंडी तलवार तसेच एक कुकरी आढळून आली. दोन्ही शस्त्रे पंचांसमक्ष जप्त करण्यात आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव. भावेश सुनील नाईक (रा. नंदुरबार) असे असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, महिला पोलीस शिपाई अंजली पवार, निंबाबाई वाघमोडे, मनाली चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विश्वनाथ नाईक, रुपेश पगारे, राजेंद्र कटके तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

नागरिकांना आवाहन

सार्वजनिक ठिकाणी कोणीही बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगत असल्याचे, संशयास्पद हालचाली करत असल्याचे अथवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर माहिती द्यावी. नागरिकांनी दिलेली वेळेवरची माहिती गंभीर गुन्हे रोखण्यास मोलाची ठरू शकते. सुरक्षित, शांततापूर्ण व गुन्हेमुक्त नंदुरबार घडविण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस सदैव कटिबद्ध आहेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

रक्तदानाचे महत्त्व आदिवासींच्या मनावर बिंबवणे काळाची गरज : डॉ. हिना गावित

Next Post

सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

Next Post
सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

सोशल मीडियावर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add