नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात लोकसभा संपर्क प्रमुख, माजी आ. शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीदरम्यान पक्ष संघटना, कार्यकारिणी, एस.आय.आर तसेच बी.एल.ए व नेमणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दरम्यान,पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन माजी आ. शिरीष चौधरी यांनी केले.
यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर चर्चा करण्यात आली.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष कार्य करावे, तसेच युवक आणि महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आ.शिरीष चौधरी यांनी केले.
बैठकीस जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, तालुकाप्रमुख अनुपकुमार उदासी, नंदुरबार लोकसभा युवा सेना उपाध्यक्ष संदीप परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक नदीम बागवान, उपजिल्हाप्रमुख डॉ. पेंढारकर, शहादा तालुकाप्रमुख मनलेश जयस्वाल, युवासेना उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, सरपंच प्रवीण वळवी, ग्रामपंचायत सदस्य दत्तू ठाकरे, मयूर पाटील, जितू गुरव, चंद्रकांत पाटील तसेच इम्रान सिक्लीकर आदी उपस्थित होते.








