अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्राळे ता. नंदुरबार येथील विजा. भज. प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य दीपक पाटील होते, प्रतिमापूजन ज्येष्ठ शिक्षक एस. पी .मगरे यांच्या हस्ते करण्यात आले. जगदीश सोनवणे, विनीत पाटील, प्रमोद पवार यांनी केले. प्राचार्य श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हेच खरे परिवर्तनाची शस्त्र आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा बाळकडू सतत घेत राहिला पाहिजे असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सुवर्ण सोनवणे यांनी केले कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.







