नंदुरबार l प्रतिनिधी-
शहादा येथे पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दि. २४ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली.
भाजपा महामंत्री विजय चौधरी म्हणाले की, शहादा येथे आज दि. २४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे. जिल्ह्यातील चार नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे. चारही ठिकाणी पक्षाने उमेदवार दिले आहेत. चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपद महत्वाचे आहे. त्यांना पक्षाने अधिकार दिले आहेत. तसेच नगर परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्याकरिता मला निवडणुक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. मित्र पक्षांना युती करायची होती तर आमच्याशी बोलले असते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे भाजपनेही स्वबळावर निवडणुक निर्णय घेतला आहे. त्यात आता माघार नाही, मित्रपक्ष असले
तरी मैत्रीपूर्ण लढत शक्य नाही, संघर्ष होईल. भाजपचा झेंडा नगर परिषदेवर फडकेल. माझ्यावर जिल्ह्यातील चारही नगर परिषदेची जबाबदारी आहे. त्याठिकाणीही लक्ष घालावे लागणार आहे. चार नगर परिषदांवर पक्षाचे चांगले उमेदवार दिले आहेत. नागरिकांना परिवर्तन हवे आहे. त्यामुळे चारही नगराध्यक्ष भाजपचे असतील असा विश्वास व्यक्त केला.








