Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

team by team
November 24, 2025
in क्राईम
0
शहादा येथील सराफाला लुटणाऱ्या 11 जणांना अटक,39 लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार l प्रतिनिधी-

शहादा येथील सराफाला लुटणारे सराईत आरोपी यांच्या ताब्यातून एकूण 38 लाख 96 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करीत 11 आरोपीना
स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे.

 

 

27 ऑक्टोंबर 2025 रोजी 10.10 वाजेच्या सुमारास शहादा पोलीस ठाणे हद्दीतील म्हसावद ते बुडीगव्हाण रोडवर बुडीगव्हाण गावाच्या पुढे रोडावर रितेश जयप्रकाश पारेख, व्यवसाय सराफ व्यवसाय, रा. सोनार गल्ली, मेनरोड, शहादा हे त्यांच्या चारचाकी वाहनाने म्हसावद येथे जात असतांना अज्ञात आरोपीतांनी रितेश पारेख यांच्या चारचाकी वाहनासमोर गाडी आडवी लावून त्यांच्याशी हुज्जत घालुन सराफ व्यावसायीक यांना गाडीतून खाली उतरून त्यांच्या गाडीचा काचा फोडून बळजबरीने गाडीतून खाली उतरवून आरोपीतांच्या वाहनात कोंबुन अग्निशस्त्र व चाकुचा धाक दाखवून रितेश पारेख यांना मारहाण करुन त्यांचे चारचाकी वाहनासह अपहरण करुन रितेश पारेख यांच्या जवळील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने हिसकावून धुळे जवळील नवलनगर येथे त्यांना त्याच्या गाडीसह तेथेच सोडुन तेथुन एका विना क्रमांकाच्या मो. सा. वरुन पळुन गेले म्हणून शहादा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 2023 चे कलम 310(2), 310(4), 311, 138, 351,115 (2) भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन 25 प्रमाणे, 4 चे उल्लंघन 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार व शहादा पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यापुर्वी 8 आरोपीतांना धुळे, अहिल्यानगर, जळगांव जिल्ह्यातून ताब्यात घेवून त्यांच्याकडून 5 लाख 36 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,

 

 

 

शहादा पोलीस ठाणे येथे दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील दोन संशयीत आरोपी विजय गायकवाड, सलमान दोन्ही रा. धुळे हे त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी स्विफ्ट वाहनाने निजामपुर मार्गे नंदुरबार कडे येणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना मिळालेली हकीगत कळवून संशयीत आरोपीतांना ताब्यात घेवून पुढील कारवाई करणेबाबत आदेशीत केले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजय रामकृष्ण गायकवाड वय 38 वर्षे, रा. प्लॉट नं 12, रामनगर, अभय कॉलेज जवळ, धुळे ता. जि. धुळे, सोहेल ऊर्फ सलमान खलील खान वय 30 वर्षे, रा. चाळीसगांव रोड, गरीब नवाज नगर, धुळे ता. जि. धुळे,नाजीम ऊर्फ कबुतर मलक अब्दुल रहमान वय 38 वर्षे, रा. मिल्लत नगर, ड्रायव्हर सोसायटी, 100 फुटी रोड, धुळे ता. जि. धुळे यांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून 16 लाख 65 हजार रुपये किमतीची 13 किलो.884 ग्रॅ. चांदीचे दागिने, 5 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन व 25 हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे अग्निशस्त्र असा एकूण 21 लाख 90 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर गुन्ह्यात आता पावेतो एकूण 11 आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 38 लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यातील काही फरार आरोपीतांचा शोध सुरु असून त्यांना ही लवकरात लवकर बेड्या ठोकण्यात येतील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी सांगितले.

सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक अशित कांबळे, शहादा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, पोलीस नाईक नितीन गांगुर्डे, विकास कापुरे, पोलीस अंमलदार शोएब शेख, अभिमन्यु गावीत, भरत उगले, सतिष घुले शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश थोरात, देविदास विसपुते, घनशाम सुर्यवंशी, पोलीस नाईक दिपक चौधरी, पोलीस अंमलदार भगवान सावळे, प्रदीप वाघ, भरत शिंपी यांनी केलेली असून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

कठोर परिश्रम,सातत्यपूर्ण अभ्यासावर जोर,’कस्तुरबा’ ची सायल बनली सहाय्यक राज्यकर आयुक्त

Next Post

भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

Next Post
भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ  शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

भाजपा उमेदवार मकरंद पाटील यांच्या प्रचारार्थ शहादा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add