Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात निम्स हॉस्पिटलमध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी, १२ तासात झाल्या ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया, पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी मिळणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार

team by team
October 18, 2021
in आरोग्य
0
जिल्ह्यात निम्स हॉस्पिटलमध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी, १२ तासात झाल्या ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया, पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी मिळणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार सारख्या अतिदुर्गम जिल्ह्याला अनेक समस्यांनी ग्रासले आहे . शासनाच्या आरोग्य सुविधांचा तुटवडा व मानव संसाधनांचा अभाव हा तर जिल्हयातील जनतेच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे . अशातच नंदुरबार जिल्ह्यात पहिली ऍन्जोग्राफी नंदुरबार शहरातील निम्स मेडीकेअर सर्जीकल डेंटल हॉस्पिटलमध्ये पार पडली आहे . विशेष ऍन्जोग्राफीसोबतच निम्स हॉस्पिटलमध्ये कालच ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया केवळ १२ तासात करण्यात आल्याने रेकॉर्ड झाला आहे . निम्स मेडीकेअर सर्जिकल ऍण्ड डेंटल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गरीब रूग्णांसह इतर रुग्णांना विविध आजारांसह शस्त्रक्रिया करण्यात येत आहे .


नंदुरबार शहरातील निम्स मेडिकेअर सर्जिकल व डेंटल रुग्णालयाच्या टीम ने जिल्ह्यात प्रथमच कॅथ लॅब ची सुविधा उपलब्ध करून दिली व त्याचे औपचारिक उद्घाटन शुक्रवारी दि . १५ ऑक्टोबर २०२१ रोजी झाले व जनतेला आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न होत असलेला दिसून आला .
निम्स मेडीकेअर आणि सर्जिकल हॉस्पिटलने काल शस्त्रक्रियांच्या विशेष टप्पा गाठला आहे . महात्मा फुले जनआरोग्य योजनेतर्ंगत नंदुरबार जिल्ह्यातील तिघा रुग्णांवर पहिली ऍन्जोग्राफी करण्यात आली . डॉ . मनोज पटेल , डॉ . प्रसाद अंधारे यांनी ऍन्जोग्राफी केली . डॉ . मनोज पटेल व डॉ . प्रसाद अंधारे हे मुळचे नंदुरबार येथील आहेत . त्याच बरोबर केवळ १२ तासात ३० एन्डोस्कोपिक व युरो सर्जरी करण्यात आल्या . सदर शस्त्रक्रिया डॉ . प्रतिक्षीत महाजन व त्यांच्या पथकाने केल्या . १२ तासात नंदुरबार सारख्या जिल्ह्यात ३० युरो सर्जरी होणे म्हणजे हा एक रेकॉर्ड मानला जात आहे . डॉ . प्रतिक्षीत महाजन हे सुध्दा नंदुरबार येथील असुन त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत .
निम्स मेडीकेअर सर्जिकल ऍण्ड डेंटल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गरीब रूग्णांसह इतर रुग्णांना विविध आजारांसह शस्त्रक्रिया करण्यात येत आहे . नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात म्हणजे सामान्यांसोबत गरीब रुग्णांना निम्स हॉस्पिटल वरदान ठरत आहे . निम्स हॉस्पिटलचे निम्स मेडीकेअर सर्जिकल ऍण्ड डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ . राजेश वसावे , डॉ . शिरीष शिंदे , डॉ . सम्राज्ञी शिंदे , कै . डॉ . प्रेरणा राजेश वसावे यांच्या योग्य नियोजनामुळे  निम्स हॉस्पिटलमध्ये मेट्रोसिटीत उपलब्ध असणार्‍या सुविधा नंदुरबार शहरात उपलब्ध झाल्या आहेत . विशेष म्हणजे ऍन्जोग्राफी आतापर्यंत धुळे , सुरत , जळगांव , नाशिक येथे उपलब्ध होती . परंतु आता नंदुरबार शहरातही उपलब्ध झाली आहे . कै . डॉ . प्रेरणा राजेश वसावे , डॉ . सम्राज्ञी शिंदे , डॉ . शिरीष शिंदे , डॉ . राजेश वसावे यांच्या अथक परिश्रमामुळे हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत . बोलताना सांगलीले .
पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराप फुले जन आरोग्य योजने अंतर्गत होणार असल्याची माहिती देखील डॉ . राजेश वसावे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली . आता आपल्या जिल्हयात बर्‍याच वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत म्हणून नंदुरबार परिसरातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

Next Post

राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील चित्रपटगृह चालकांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add