Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदनगरीत प्रथमच १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाची महाआरती; संगमतीर्थ गंगाजलच्या १ लाख बाटल्यांचेही होणार वितरण

team by team
March 4, 2025
in राजकीय
0
महाकुंभ 2025: विश्वातील सर्वांत मोठ्या धार्मिक मेळाव्याची ऐतिहासिक सांगता

नंदुरबार l प्रतिनिधी

प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा पार पडणार आहे. त्याचबरोबर प्रयागराज संगमतीर्थ गंगाजलच्या १ लाख बाटल्यांचेही नंदनगरी वासियांना वितरण देखील केले जाणार आहे.

 

हा २१ व्या शतकातील दुर्मिळ योग असून नंदनगरीच्या इतिहासात प्रथमच असा सोहळा पार पडणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे. अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) यांनी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून अधिक माहिती देताना सांगितले की, प्रयागराज येथील संगमतीर्थ महाकुंभ जलकलश प्रथमच महाराष्ट्रातल्या नंदनगरीत येत असून या निमित्ताने १००१ दाम्पत्यांच्या हस्ते महाकुंभ जलकलशाचा भव्य महाआरती सोहळा दिनांक : ०९ मार्च २०२५, रविवार, सायं. ७ वा. पोलीस कवायत मैदान, नेहरु पुतळा जवळ, नंदुरबार येथे संपन्न होईल.

 

त्याचबरोबर प्रयागराज संगमतीर्थ गंगाजल पाण्याच्या १ लाख बाटलींचे नंदनगरी वासियांना वितरण देखील केले जाईल. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अविनाशजी जोशी (भागवत कथाकार, नंदुरबार) तसेच स्वानंदजी ओक (अनुलोम, महाराष्ट्र राज्य प्रमुख) हे लाभले आहेत. तरी नंदनगरीतील समस्त जनतेची उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे आवाहन मा. आदिवासी विकास मंत्री तथा आमदार, डॉ. विजयकुमार गावीत , अमळनेर विधानसभेचे मा. आमदार शिरीष चौधरी, जिजामाता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत मोरे , श्री. अमोल गायकवाड (उत्तर महाराष्ट्र विभाग जनसेवक, अनुलोम) आयोजक अॅड. प्रितम प्रविण निकम (नंदुरबार लोकसभा जनसेवक, अनुलोम) संदिप ढोले (नंदुरबार विधानसभा भाग जनसेवक, अनुलोम) यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात पुष्पा स्टाईलने बनावटी अंड्यांचा आडुन अवैध मद्य तस्करी,13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सिंदगव्हान ग्रामपंचायत च्या सरपंचपदी विद्या पाटील तर उपसरपंचपदी मंगला पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post
सिंदगव्हान ग्रामपंचायत च्या सरपंचपदी विद्या पाटील तर उपसरपंचपदी मंगला पाटील यांची बिनविरोध निवड

सिंदगव्हान ग्रामपंचायत च्या सरपंचपदी विद्या पाटील तर उपसरपंचपदी मंगला पाटील यांची बिनविरोध निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026
स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

स्टेट बँकेत सुरक्षारक्षकाकडून चुकून गोळीबार; एक जण जखमी

June 4, 2026
महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add