नंदुरबार l प्रतिनिधी
विविध घटकांना प्रगतीपथावर आणण्याबरोबरच भारतीय जनता पार्टी च्या युती सरकारने शेतकऱ्यांना देखील विविध योजनांच्या लाभ दिला असून आर्थिक आधार उपलब्ध करून दिले आहेत शेतकऱ्यांनी त्या योजनांचा लाभ घेऊन आधुनिक तंत्राची जोड देत विकसनशील शेती करण्याचे मार्ग अवलंबले पाहिजे; असे आवाहन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र कोळदा येथे किसान सन्मान समारोह संपन्न झाला. या कार्यक्रमाला नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी, अध्यक्ष डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार केदारनाथ कवडीवाले, कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता यू बी होले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी के ठाकरे, डी डी एम नाबार्ड रवींद्र मोरे, कृषीतज्ञ बापू शिंदे, शास्त्रज्ञ पद्माकर कुंदे शास्त्रज्ञ जयंत उत्तरवार, शास्त्रज्ञ उमेश पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रसंगी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विकसित शेती कशी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले.