नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे दि.२ मार्च रविवार रोजी श्री जी वाचनालय व साहित्य भारती नंदुरबार तर्फे सुप्रसिद्ध पटकथा लेखक, अभिनेता, कादंबरीकार अभिराम भडकमकर यांच्या ‘ इन्शाल्लाह ‘ या कादंबरीवर आधारित अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या अभिवाचनासाठी भडकमकर यांच्या सह दूरदर्शन मालिका अभिनेत्री स्वाती चिटणीस, कलाकार सचिन सुरेश,सलिम मुल्ला आदि मान्यवर सहभागी होणार आहेत.
अभिराम भडकमकर हे एक भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक आहेत. त्यांनी प्रामुख्याने विविध चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये लेखक म्हणून काम केले आहे. लेखक म्हणून त्यांचे काही प्रसिद्ध चित्रपट म्हणजे बालगंधर्व, संयुक्त संगीत मानापमान,पछाडलेला,आई,खबरदार,अ रेनी डे, पाऊलवाट आणि बरेच काही. प्रसिद्ध मराठी नाटके देहभान,आल्टून-पालटुन , पाहुणा ,सुखाशी भांडतो आम्ही ,लाडी नजरिया , हसतखेळत , ज्याचा त्याचा प्रश्न आणि इतर अनेक. त्यांची नाटके मराठी रंगभूमीव्यतिरिक्त हिंदी , कन्नड आणि गुजरातीमध्ये सादर केली जातात. त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे आम्ही आसू लडके , अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सादर आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांचा संग्रह प्रसिद्ध प्रकाशक/प्रकाशनांनी प्रकाशित केला आहे. चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रशंसा मिळाली आहे. त्यांनी वेगवेगळ्या मराठी आणि हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. अभिराम यांनी आगामी मराठी विनोदी चित्रपट ‘ जलसा’ची कथा लिहिली आहे .
स्वाती चिटणीस या एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, टेलिव्हिजन आणि मराठी रंगभूमीवर काम केले आहे. २०१६ ते २०२३ पर्यंत स्टार प्लसवरील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या सोप ऑपेरा ,ये रिश्ता क्या कहलाता है च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील सुहासिनी अजमेरा गोएंका ज्यांनी कार्तिक गोएंका यांची आजी म्हणून तर अक्षरा गोएंका व अभिरा शर्मा यांची पणजी म्हणून प्रमुख भूमिका केली आहे. चिटणीस यांनी शुभमंगल सावध आणि ही पोरगी कुणाची यांसारख्या चित्रपटात भूमिका केल्या आहेत लगी तुझसे लगन , भाई भैया और ब्रदर सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. स्टार प्लसच्या इस प्यार को क्या नाम दूं या मालिकेतही त्या दिसल्या होत्या तसेच दादी (सुभद्रा / सुमी), अर्णवच्या आजीची भूमिका त्यांनी केली होती.
सचिन सुरेश -यांनी झी मराठीवरील मॅरेथॉन मालिका ‘तू तिथं मी’ मध्ये सुहास, लहरी आणि जिद्दी स्त्री प्रियाचा नवरा म्हणून काम केले आहे. सुहासची ही भूमिका साकारणारा सचिन सुरेश मराठी मालिकांसाठी नवीन नाहीत; याआधी ‘आभाळमाया’, ‘पिंपळपान’, ‘तुझे नी माझे घर श्रीमंताचे’, ‘गंगुबाई’, ‘ऐन पाऊस’, ‘हे गोजिर्वाण्या घरात’, चार चौघी’, ‘भाग्यविधाता’, ‘भैरोबा’ आणि इतर काही लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. पण, ‘तू तिथं मी’च्या माध्यमातून त्याने एक तरुण टीव्ही स्टार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
सलीम मुल्ला हे एक नाट्य कलाकार असून मुक्त लेखक, गीतकार,अभिवाचक आहेत.मै अटल हूं चित्रपटात त्यांनी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची भूमिका साकारली असून.येक नंबर, डब्बा कार्टेल या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
यावेळी दि.२ मार्च रोजी सकाळी १०.३० ते ४ यावेळेत नवसाहित्यिक कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली आहे यासाठी केवळ ५० जणांची नोंदणी केली जाणार असून त्यासाठी रू.५०/-नोंदणी शुल्क आकारले जाईल.१५ त्यावरील वयोगटातील इच्छुकांनी नोंदणी शुल्कासह नांवे नोंदवावयाची आहेत.या कार्यशाळेत अभिराम भडकमकर,स्वाती चिटणीस, प्राचार्य संजीव गिरासे, कवयित्री निकीता भागवत असोदेकर यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
सायंकाळी होणारा अभिवाचन कार्यक्रम सर्वांसाठी कन्यादान मंगल कार्यालय, अहिंसा चौक येथे होणार आहे.तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री जी वाचनालय व साहित्य भारती नंदुरबारतर्फे श्री जी वाचनालय व साहित्य भारती नंदुरबार जिल्हा अध्यक्ष संदीप चौधरी, कार्याध्यक्ष डॉ मनोज शेवाळे, जिल्हा मंत्री ॲड प्रीतम निकम,दीपक कुळकर्णी, शशिकांत घासकडबी, डॉ सविता पटेल ,प्रा.प्रशांत , अभिषेक राजपूत, भानुदास शास्त्री बागूल यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.