नंदुरबार येथे जिल्हा शल्यचिकित्सकपदी मुंबई येथील सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधिक्षक चारुदत्त शिंदे यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. डॉ.शिंदे यांनी बदलीच्या ठिकाणी त्वरीत हजर होवून त्याबाबतचा अहवाल संचालक आरोग्यसेवा मुंबई व शासनास सादर करण्याचे अव्वर सचिव चंद्रकांत वडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकपदी डॉ.रघुनाथ भोये यांनी १ जुलै २०१४ रोजी कार्यभार घेतला होता. तब्बल ७ वर्षानंतर त्यांची बदली झाली आहे. डॉ.रघुनाथ भोये यांना पदस्थापना देण्यासंबंधी स्वतंत्र कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.