Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोट्या आदिवासींना अनुसूचित जमातीचे फायदे घेण्यापासून रोखण्यासाठी पथराई येथे एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

team by team
October 8, 2021
in राज्य
0
खोट्या आदिवासींना अनुसूचित जमातीचे फायदे घेण्यापासून रोखण्यासाठी पथराई येथे एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

नंदुरबार | प्रतिनिधी
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व खोट्या आदिवासींना अनुसूचित जमातीचे फायदे घेण्यापासून कशा प्रकारे थांबवता येईल यावर चिंतन आणि मंथन व्हावे यासाठी पथराई येथील सैनिक शाळेत दि.१० ऑक्टोबर रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.तरी समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी, संघटनांनी एकत्र येत चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र गावित, विरेंद्र वळवी यंानी पत्रकार परीषदेत केले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या २०१७ च्या जगदीश बहिरा निकालानंतर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचीकेनंतर राज्य शासनाने अनुसूचित जमातींची पद भरतीसाठी दि.२१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला . राज्यात १९९५ पासून अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त झालेल्या गैर आदिवासींचा सेवा संरक्षणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे . सर्वोच्च न्यायालयाने असे सेवा संरक्षण नाकारल्यानंतर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेने राज्य सरकारच्या सेवा संरक्षणाच्या धोरणाला चांगलेच अडचणीत आणले आहे . ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करू अनुसूचित जमातीच्या संवर्गातून सुशिक्षित बेरोजगार आदिवासी साठी राज्यात पहिल्यांदाच शासकीय सेवेत हजारो पदे निर्माण करून राज्यातील आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांसाठी आशेच किरण आणला आहे . आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व खोट्या आदिवासींना अनुसूचित जमातीचे फायदे घेण्यापासून कशा प्रकारे थांबवता येईल यावर चिंतन आणि मंथन व्हावे यासाठी राजेंद्र गावित,डॉ . विशाल वळवी,विरेंद्र वळवी,डॉ.राजेश वळवी,ईश्‍वर गावीत,ऍड.गोमता पावरा,गिरीश वसावे यांच्या माध्यमातून आणि पुढाकाराने एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन सैनिक शाळा , पथराई , ता . जि . नंदुरबार शाळेच्या प्रांगणात दि.१० ऑक्टोबर , २०२१ रोजी करण्यात आले आहे . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते  गोवर्धन मुंडे , नांदेड व ऍड.राजेंद्र मरस्कोल्हे , नागपूर येणार आहे . आदिवासींच्या आरक्षण विषय प्रश्नावर येत असलेल्या सामाजिक , प्रशासकीय व न्यायिक अडचणीवर या चर्चासत्रात प्रामुख्याने चर्चा होणार आहे . त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात आणि  सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या अनुषंगाने विविध याचिका व त्यातील सध्यास्थिती आणि त्याचे अनुसूचित जमातींवर होणारे परिणाम यावर प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .असल्याचे राजेंद्र गावित, विरेंद्र वळवी यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले.

बातमी शेअर करा
Previous Post

सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी 12 ऑक्टोबर 2021 रोजी मुलाखती

Next Post

आजाराला कंटाळून ३० वर्षीय महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

Next Post

आजाराला कंटाळून ३० वर्षीय महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add