नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकार पक्षातर्फे केसेस चालविण्याकरिता मानधन तत्वावर अभियोक्ता यांची नामिका (पॅनल) तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.
त्यानुसार 30 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांची 12 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी नंदुरबार तथा अध्यक्षा, विशेष सहायक सरकारी अभियोक्ता निवड समिती, नंदुरबार यांच्या दालनात मुलाखत होईल. संबंधित उमेदवारांनी मुलाखतीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.