नंदुरबार | प्रतिनिधी
आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व खोट्या आदिवासींना अनुसूचित जमातीचे फायदे घेण्यापासून कशा प्रकारे थांबवता येईल यावर चिंतन आणि मंथन व्हावे यासाठी पथराई येथील सैनिक शाळेत दि.१० ऑक्टोबर रोजी एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.तरी समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी, संघटनांनी एकत्र येत चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र गावित, विरेंद्र वळवी यंानी पत्रकार परीषदेत केले.
यावेळी ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या २०१७ च्या जगदीश बहिरा निकालानंतर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचीकेनंतर राज्य शासनाने अनुसूचित जमातींची पद भरतीसाठी दि.२१ डिसेंबर २०१९ रोजी शासन निर्णय निर्गमित केला . राज्यात १९९५ पासून अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातून नियुक्त झालेल्या गैर आदिवासींचा सेवा संरक्षणाचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे . सर्वोच्च न्यायालयाने असे सेवा संरक्षण नाकारल्यानंतर ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल संघटनेने राज्य सरकारच्या सेवा संरक्षणाच्या धोरणाला चांगलेच अडचणीत आणले आहे . ऑर्गनायझेशन फॉर राइट्स ऑफ ट्रायबल यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करू अनुसूचित जमातीच्या संवर्गातून सुशिक्षित बेरोजगार आदिवासी साठी राज्यात पहिल्यांदाच शासकीय सेवेत हजारो पदे निर्माण करून राज्यातील आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांसाठी आशेच किरण आणला आहे . आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील व खोट्या आदिवासींना अनुसूचित जमातीचे फायदे घेण्यापासून कशा प्रकारे थांबवता येईल यावर चिंतन आणि मंथन व्हावे यासाठी राजेंद्र गावित,डॉ . विशाल वळवी,विरेंद्र वळवी,डॉ.राजेश वळवी,ईश्वर गावीत,ऍड.गोमता पावरा,गिरीश वसावे यांच्या माध्यमातून आणि पुढाकाराने एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन सैनिक शाळा , पथराई , ता . जि . नंदुरबार शाळेच्या प्रांगणात दि.१० ऑक्टोबर , २०२१ रोजी करण्यात आले आहे . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन मुंडे , नांदेड व ऍड.राजेंद्र मरस्कोल्हे , नागपूर येणार आहे . आदिवासींच्या आरक्षण विषय प्रश्नावर येत असलेल्या सामाजिक , प्रशासकीय व न्यायिक अडचणीवर या चर्चासत्रात प्रामुख्याने चर्चा होणार आहे . त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या अनुषंगाने विविध याचिका व त्यातील सध्यास्थिती आणि त्याचे अनुसूचित जमातींवर होणारे परिणाम यावर प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे .असल्याचे राजेंद्र गावित, विरेंद्र वळवी यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले.