Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे

team by team
October 8, 2021
in क्राईम
0
नंदुरबार | प्रतिनिधी

सरकारी कामात अडथळा आणून पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी कोरीट ता.नंदुरबार येथील दोन तर शहादा तालुक्यातील पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना शिवीगाळ करु नका व आरडाओरड करु नका असे पोलीसांनी सांगितल्याचा राग आल्याने कोरीट ता.नंदुरबार येथील अनिल रमेश कोळी व गोपाळ शांतीलाल कोळी यांनी पोलीस शिपाई अनिल जिभाऊ बिर्‍हाडे यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली तसेच हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच नेमप्लेट तोडून टाकली. त्यानंतर समजावण्यासाठी आलेल्या महिला अधिकार्‍यालादेखील शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी बिर्‍हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत, प्रतिबंधीत क्षेत्रात ठेवलेल्या टेबल व खुर्च्या प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर ठेवण्यास सांगितल्याचा राग आल्याने शहादा येथील विद्याविहार येथील संजय ओंकार पाटील, दीपक भिला चौधरी, हर्षद भिला पटेल, पंकज सुधीर चौधरी, कैलास ओंकार पाटील यांनी गैरकायद्याची मंडळी गोळा करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सहदेव अराक यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत अराक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्षपदी माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांची नियुक्ती

Next Post

निंबोणी येथे शाश्वत उघड़यावरिल हागणदारीमुक्त अभियानांतर्गत विविध उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add