Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

team by team
October 6, 2026
in राजकीय
0
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

 

नंदुरबार l प्रतिनिधी-

काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात झाला. ग्रामीण भागात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्यासह शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.

आमदार डॉ. विजयकुमार गावित, डॉ. हिना गावित व डॉ. सुप्रिया गावित यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र गावित, चिंतामणी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज पाटील, एन. डी. नांद्रे, नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील, माजी सरपंच बेबीताई भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय भास्करराव बोरसे व सौ. प्राजक्ता विजय बोरसे यांनीही भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

भालेरच्या सरपंच कविता चंद्रशेखर पाटील, खोंडामळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील, भाजपचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक दशरथ पाटील, काकरदेचे सरपंच राकेश माळी, विठोबा माळी, भरत मराठे, कंढरे सरपंच लोटन पाटील, जुनमोहिदेचे माजी सरपंच प्रल्हाद पाटील, आमळथा येथील माजी सरपंच चतुरसिंग राजपूत यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.
कीर्तनातून कार्याचा गौरव.
अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हरिभक्त परायण रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय कीर्तनातून आबासाहेबांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
तीनही विद्यालयांतर्फे सत्कार.

काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या तीनही विद्यालयांच्या वतीने आबासाहेबांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड सामाजिक-शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देत सामाजिक परिवर्तन घडविणाऱ्या त्यांच्या कार्याचा मान्यवरांनी गौरव केला.

 

परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी, पालक व हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या तीनही विद्यालयांतील प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

Next Post

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

Next Post
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026
शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद

October 4, 2026
गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

गांधी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांचे विविध उपक्रम

October 4, 2026
पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

पालिका पाणीपुरवठा योजना चांगल्या दर्जाची करणार;आ. चंद्रकांत रघुवंशी

October 4, 2026
नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

नांदरखे आश्रम शाळेत स्वच्छता अभियान उत्साहात

October 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add