Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

team by team
October 14, 2026
in क्राईम
0
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

नंदुरबार l प्रतिनिधी-

ज्वारीच्या पिकाआड गांजाची लागवड करून त्याची जोपासना केली जात असल्याचा प्रकार अक्कलकुवा तालुक्यातील मोदरापाडा येथे उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १२) छापा टाकून तब्बल **२८ लाख ५८ हजार ३०० रुपये किमतीची ५८ किलो २४६ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी सोत्या काल्या तडवी (वय ६०, रा. मोदरापाडा, हुणाखांब, ता. अक्कलकुवा) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची वाहतूक व साठा, बेकायदेशीर शस्त्रे आणि अमली पदार्थांची लागवड याविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना १२ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाली. मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुणाखांब गावाच्या शिवारात, मोदरापाडा येथे एका इसमाने स्वतःच्या ज्वारीच्या शेतात बेकायदेशीररीत्या गांजाची लागवड केल्याची माहिती त्यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पथकाने संबंधित शेताची पाहणी केली असता तेथे गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी या झाडांचे वजन व मूल्य निश्चित करून २८ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ज्वारीच्या पिकासोबत गांजाची लागवड करून त्याची जोपासना केल्याचा आरोप सोत्या काल्या तडवी याच्यावर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त गांजाचे प्रमाण आणि त्याची किंमत लक्षात घेता, दुर्गम भागातील शेतशिवारात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या बेकायदेशीर लागवडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, महेश निकम, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, स्वप्नील गोसावी, मुकेश तावडे, जितेंद्र पाडवी तसेच पोलीस अंमलदार अनिल नागरगोजे, अभय राजपूत, हेमंत बारी, विनोद पाटील आणि रवींद्र अहिरे यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

Next Post

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026
मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

मोदरापाड्यात २९ लाखांचा गांजा हस्तगत

October 14, 2026
जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध

October 14, 2026
विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग!

October 14, 2026
सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

सैनिकी विद्यालयात सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम

October 6, 2026
भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

भास्करराव पाटील यांचा ७९ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

October 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add