नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड याने शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शिबिरात भाषण करतांना हिंदु धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभु श्रीरामचंद्र यांच्याबद्दल अवमानकारक जाणून बुजून वक्तव्य केले आहे.
म्हणून आ. जितेंद्र आव्हाड याच्यावर हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र परशराम पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊन जितेंद्र आव्हाडवर भादवि कलम १५३(अ), २९५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार ५ जानेवारी रोजी दाखल केली.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, ”शिकार करून खाणारा राम” “आम्ही रामाच्या आदर्श पाळत आहोत आणि आज आम्ही मटण खात आहोत हा रामाच्या आदर्श आहे” “राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता” असे अभद्र आणि अपमानास्पद वक्तव्य करून आणि हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद यांचे बद्दल जाणून बुजून केलेले वक्तव्य बेताल खोटे असून त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना आणि सामाजिक भावना दुखावली आहे .
प्रभू श्रीरामचंद जगातील कोट्यावधी हिंदूंचे श्रद्धास्थान असून राम नामाचे अनन्य असाधारण महत्त्व असून राम म्हणजे मोक्ष प्राप्तीच्या मार्ग आहे 500 वर्षाच्या संघर्षानंतर 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठा समारोह असताना जितेंद्र सतीश आव्हाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने जाणून-बुजून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने हे बेताल वक्तव्य केले असून या वक्तव्यातून हिंदू धर्माबद्दल आणि प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल द्वेष दृष्टत्वाची भावना निर्माण करून हिंदू धर्मात एकोपा टिकवण्यास बाधक वक्तव्य केले आहे.
त्यामुळे हिंदू धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे बुद्धी पुरस्कृत आणि दुष्ट हेतूने केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावनांच्या अत्याचार करून धार्मिक शब्दांच्या अपमान केलेला आहे.
यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने आ. जितेंद्र आव्हाड याचे विरुद्ध हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील यांनी दखलपात्र गुन्ह्याची कायदेशीर फिर्याद ५ जानेवारी रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार दाखल करतेवेळी भागवतकर रविंद्र पथक गुरुजी, उद्योगपती सुरेश अग्रवाल, चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत, भैय्या मराठे, पंकज डाबी, उज्वल राजपूत, जयेश भोई, गणेश राजपूत, पंकज मुसळे आदी उपस्थित होते.








