नंदूरबार l प्रतिनिधी
सिंदगव्हाण ता नंदुरबार येथील सर्वोदय विद्यालयात ७७ वा.भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्ताने विद्यालयाचे ध्वजारोहण श्रीगणेश शिक्षण मंडळाचे सचिव यू.एम.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यींनींनी देशभक्तीपर गीते सादर केलीत.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एस.डी.पाटील होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष बी.एल.पाटील, खजिनदार बी.डी.पाटील. संचालक के.बी.पाटील, दगाजीराव पाटील, डाॅ.नितीन पाटील, डाॅ.सुदाम बोरसे, माजी सरपंच भारत पाटील, पोलीस पाटील विश्वास बोरसे, भावराव बोरसे,संजय पाटील,
विनायक भाईदास पाटील,विनायक पाटील, रणधीर पाटील ग्रामस्थ व शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.वाय.पाटील, यांनी केले तर सुत्रसंचालन उपशिक्षक ए.डी.शिंदे यांनी केले.उपशिक्षक पी.एल.चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.