Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वैदाणे येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणा बाबत मार्गदर्शन

team by team
August 18, 2023
in राज्य
0
वैदाणे येथे कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणा बाबत मार्गदर्शन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील वैदाणे येथे राज्य पुरस्कृत एकात्मीक कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास प्रकल्पातंर्गत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी, उप विभागीय कृषि अधिकारी चेतन ठाकरे, तालुका कृषि अधिकारी सुनिल गांगडे व मंडळ कृषि अधिकारी वैभव कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गणपत खंडू पाटील यांच्या शेतावर शेतक-यांच्या शेतीशाळेच्या ३. या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
गुलाबी बोंडअळीमुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते सदर अळीचा प्रादुर्भाव कापूस पिकाच्या लागवडीपासून ४० ते ४५ दिवसानंतर पाती, फुले व बोड अवस्थेपासून पासून सुरु होतो. प्रादुर्भाव झालेली फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळी सारखी दिसतात. प्रादुर्भाव हीरव्या बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो एकदाका अळी बोंडामध्ये शिरलो की बोंडावरील छिद्र बंद होत असल्याने वरून प्रादुर्भाव दिसून येत नाही परंतू हरवी बोंडे फोड्न पाहील्यावर आत मध्ये गुलाबी रंगाच्या आळया दृष्टीस पडतात बोंडातील अळया रुई व सरकी खातात त्यामुळे कापसाची प्रत खराब होते व वजन घटते व उत्पादनात घट येते.
या अळीच्या नियंत्रणा करीता कमी कालावधीच्या वाणाची लागवड करावी. कापूस पिकात मका ज्वारी आंबाडी या सारखी सापळा पिके लावावीत. कापूस पिक पाती व बोंड अवस्थे असतांना ५ टक्के निंबोळी अर्क किया दशपर्णी अर्कची फवारणी करावी, कापूस पिकात हेक्टरी ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. सुरवातीच्या काळात इमीडाक्लोप्रीड थायोमीथॉक्झॉम आणि अॅसीफेट या कीटक नाशकांचा वापर करु नये कारण ही कीटक नाशके झाडाच्या कायीक वाडीचा कार्यकाळ लांबवतात व पोकाचा परीपक्वता कालावधी वाढवतात असे कृषि पर्यवेक्षक सुनिल पवार यांनी शेतक-यांना सांगून गणपत पाटील यांच्या शेतावर कामगंध सापळे प्रत्यक्ष लावून दाखविले.
तसेच सदर प्रशिक्षण वर्गात कृषि सहाय्यक सुधिर वाघमारे यांनी कापूस पिकावरी मित्रकिडी आणि शत्रु किडी यांची माहीती देऊन निरीक्षणाव्दारे शेतक-यांना किडींची ओळख करुन दिली. तसेच रस शोधन करणा-या किडीच्या नियंत्राणा करीता ५ टक्के निबोळी अर्क घरच्या घरी कसा तयार करावा याचे प्रात्यक्षीक शेतक-यांना करुन दाखविले व एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबत शेतक-यांना माहीती दिली.सदर प्रकल्पातंर्गत प्राप्त झालेल्या निनिविष्ठांचे वाटप सरपंच प्रविण पाटील व माजी सरपंच मोतीलाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रगतीशील शेतकरी गणपत पाटील, राजू पाटील,उत्तम पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते कृषि सहाय्यक सुधिर वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

Next Post

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात स्वातंत्र्य दिनी माजी सैनिकांचा सत्कार

Next Post
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात स्वातंत्र्य दिनी माजी सैनिकांचा सत्कार

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात स्वातंत्र्य दिनी माजी सैनिकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add