Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ, संरक्षण कायद्याची केली होळी

team by team
August 18, 2023
in Uncategorized
0
धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ, संरक्षण कायद्याची केली होळी
धुळे । प्रतिनिधी
राज्यात पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अमलबजावणी होत नाही. या निषेधार्थ धुळ्यात पत्रकारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवत या संरक्षण कायद्याची होळी करून रोष व्यक्त केला. तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन कायदयाची सक्त अमलबजावणी आणि आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही केली.
     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या पुढाकाराने विविध १८ संघटनांनी एकत्र येऊन आज १७ ऑगस्ट रोजी राज्यभर एकाच दिवशी या संरक्षण कायद्याची होळी करून आंदोलन केले. धुळ्यात मराठी पत्रकार परिषेदेशी संलग्न पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या पुढाकाराने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ,भारतीय पत्रकार संघ , खान्देश पत्रकार संघ , धुळे तालुका मराठी पत्रकार संघ , जनग्रामीण पत्रकार संघ , व्हॉइस ऑफ मीडिया , यांच्यासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनिधी , छायाचित्रकार यांनी धुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यानजीक एकत्र येऊन आपली एकजूट दर्शवली.बाबासाहेबाना पुष्पहार अर्पण करून  पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा , हल्ले करणाऱ्यांचा आणि कायदयाची अमलबजावणी न करणाऱ्या सरकारच निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या . पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करून पत्रकारांनी आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर सर्व पत्रकारांनी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेऊन चर्चा केली.
पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत कायद्याची सक्त अंमलबजावणी झाली पाहिजे. पाचोऱ्याच्या घटनेत पत्रकारास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आ. किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द व्हावे, अश्या मागण्या करून निवेदन देण्यात आले.
      या आंदोलनाला प्रा. अनिल चव्हाण , मनोज गर्दे ,देवानंद अहिरे, अतुल पाटील, राजेंद्र गर्दे,  गोपी लांडगे , बापू ठाकर , नत्थू गुजर ,अरुण पाटील , रोहिदास हाके, दिलीप विभांडीक , रवींद्र इंगळे ,  प्रभाकर सूर्यवंशी , राजेंद्र सोनार , शैलेश साळे , चुडामण पाटील , मिलिंद बैसाणे, सुनील पाटील, रणजित शिंदे , गोरख पाटील ,निंब मराठे,  किशोर पाटील , अजय भदाणे , शिवाजी पाटील , सतीश भावसार , गजेंद्र पाटील , भटू पाटील , विशाल पाटील, राकेश गाळनकर, विठोबा माळी , दीपक देवरे , उमाकांत पाटील, प्रमोद वाणी , अमोल पाटील , पी.एल.पाटील , हेमंत जगदाळे , मनिष मसोळे , धनंजय गाळनकर , बी.के. सूर्यवंशी, धनंजय दीक्षित , नितीन इंगळे, दिगविजय गाळणकर, योगेश इशी, चंद्रकांत महाजन , महेंद्र येवले , भरतसिंग  राजपूत, उमेश कढरे, जॉनी सर , मुरलीधर जाधव, सचिन बागुल , रामकृष्ण पाटील , रमेश बोरसे , संजय देवरे, संदीप अहिरे , रमेश करणकाळ ,  एम.जे. मकासरे यांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे या आंदोलनासाठी मालेगाव  येथून महाराष्ट्र रक्षक न्यूजचे युसूफ पठाण, खान यांची उपस्थिती होती.  तसेच हेमंत मदाने , योगेंद्र जुनागडे , आशुतोष जोशी, प्रा. जसपाल सिसोदिया, राजेंद्र शर्मा, निखिल सूर्यवंशी , विलास पवार , संतोष मासोळे नितीन जाधव, निलेश भंडारी, निलेश बोरसे , धर्मेंद्र जगताप  राम निकुंभ , यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे कळविले.
बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे : पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित

Next Post

सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

Next Post
सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

सर्वोदय विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add