Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे : पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित

team by team
August 18, 2023
in Uncategorized
0
दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे :  पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित
म्हसावद l प्रतिनिधी
     दिव्यांग व्यक्ती हा स्वाभिमानाने जगला पाहिजे शासनाने त्यांच्यासाठी शासनाकडून अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आमचे कर्तव्य आहे.समाजातील दुर्बल व दुर्लक्ष दिव्यांगांना जीवनातील अंधकार दूर करून त्यांना समाजाच्या  मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्याचे शिक्षण प्रशिक्षण संदर्भात असलेल्या शिष्यवृत्ती योजना दिव्यांग कर्ज योजना मोफत कृत्रिम साहित्य साधने दिव्यांग राज्य शासन पुरस्कृत योजना अशा विविध योजना तळागाळापर्यंत योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवणार असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी केले.
    शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील राम मंदिर सभागृहात दिव्यांग बांधवांना अंत्योदय शिधापत्रिका तसेच शालेय विद्यार्थ्यांना दप्तर तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाच्या आयोजन महात्मा ज्योतिबा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती  हेमलता शितोळे करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित होते याप्रसंगी प्रांताधिकारी सुभाष दळवी, शहादा तहसीलदार दीपक गिरासे,
धडगाव तहसीलदार कल्पेश जाधव, समता परिषदेचे विनोद अहिरे, नायब तहसीलदार विजय साळवे, मंडळ अधिकारी गजानन पवार, कोंढावळचे सरपंच गोपाल भील,  उपसरपंच हिराबाई माळी, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिपक माळी, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय पाटील, माजी सरपंच फुलसिंग भील, सेवानिवृत्त पोलीस पाटील, सुरेश गोसावी, माजी सरपंच दिलीप भील, लक्ष्मण भिल, बामखेडा सरपंच मनोज चौधरी, उपसरपंच अभय गोसावी, सामाजिक कार्यकर्ते बापू मराठे, खेडदिगर चे समाजिक कार्यकर्ता देवीदास माळी, खापरखेड़ा सरपंच सरकार भील, ग्रामसेवक गोविंद गिरासे आदीसह परिसरातील आजी माजी सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,  दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
यावेळी ना डॉ गावित पुढे म्हणाले,कामगार विभागात परिसरातील मजुर बांधवांनी नोंदणी करून घ्यावी नोंदणी केलेल्या कामगार विभागाच्या विविध योजनांसह त्या लाभार्थ्याला दोन लाखापर्यंत घरकुल योजना असून त्याचा लाभ घ्यावा तसेच २०२४ पर्यंत प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळतील असे आश्वासित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार माळी यांनी केले सूत्रसंचालन कैलास शेंगदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार  महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान महाराज्यचे संस्थापक  यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्योजक शशिकांत पाटील, ग्रा प सदस्य निंबा माळी, अर्जुन शेवाळे, भिकूबाई भील, आशाबाई भील, रूबदास भील, ब्रिजलाल भील, जि प शाळेचे मुख्याध्यापक मनोहर पाटील, पत्रकार जगदीश माळी, तुषार माळी, नारायण अहिरे,भानुदास माळी, नरेन्द्र सैंदाने, रविंद्र माळी, कैलास सैंदाने, नाना मिस्तरी, रूबदास भील, महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठानचे शहादा तालुका अध्यक्ष संजय मिस्तरी, गणेश निंबा वाल्हे  आदि गावातील तरुण  तसेच महात्मा फुले अपंग सेवाभावी प्रतिष्ठान चे  कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेना ठाकरे गटाची तळोदा कार्यकारिणी आ. आमश्या पाडवी यांनी केली घोषीत

Next Post

धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ, संरक्षण कायद्याची केली होळी

Next Post
धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ, संरक्षण कायद्याची केली होळी

धुळ्यात पत्रकारांनी एकजूट दाखवत आवळली वज्रमूठ, संरक्षण कायद्याची केली होळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add