नंदुरबार | प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील जामदे येथे दि. २७ सप्टेंबर सोमवारी रोजी रात्री सप्ताहाचा सहावा दिवस सुरू होता. निरुपणाला सुरुवात झाली. यानंतर तुका म्हणे येथे भजन प्रमाण हे प्रमाणाचे चिंतन मांडत असतानाच किर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख त्यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर ते खाली बसले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे हलविण्यात आले. मात्र, तोपर्यत त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगितले.किर्तनाच्या व्यासपीठावरच ताजुद्दिन महाराज शेख यांनी प्राण सोडले. त्यांच्या या निधनानंतर वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी शोकसंवेदना प्रकट केल्या आहेत.
जामदे ता. साक्री या गावात गेल्या आठवड्यापासुन ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू होता. सकाळी ज्ञानेश्वरी पारायणानंतर रोज रात्री वेगवेगळ्या किर्तनकारांचा किर्तनाचा कार्यक्रम होत असे. दि. २७ सप्टेंबर सोमवारी रोजी सोमवारी रात्री सप्ताहाचा सहावा दिवस सुरू होता. निरुपणाला सुरुवात झाली. यानंतर तुका म्हणे येथे भजन प्रमाण हे प्रमाणाचे चिंतन मांडत असतानाच ताजुद्दिन महाराज शेख यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर ते खाली बसले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे हलविण्यात आले. मात्र, तोपर्यत त्यांची प्राणज्योत मालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतर जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे बोदलापुरी आश्रमावर त्यांचे पार्थिव पाठवण्यात आले. एका नामवंत किर्तनकारांचा किर्तनाच्या व्यासपीठावर झालेला शेवट खर्या अर्थाने सर्वत्र चर्चेचा विषय देखील ठरत आहे.ताजुद्दिन महाराज हे मुस्लिम समाजाचे असले तरी वारकरी संप्रदायाची जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती. वारकरी संप्रदायात मुस्लिम समाजाचा कीर्तनकार म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा याबाबत त्यांनी सदैव जनजागृती केली. मूळचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी गावचे रहिवाशी होते. गावासह पैठणमध्येही त्यांनी एक आश्रम सुरू केला. त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार-प्रचाराचे काम केले जाते. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात पहिलीच अशी घटना घडली की, कीर्तन करीत असताना कीर्तनकारांचा मृत्यू झाला. नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साक्री तालुक्यातील जामदे येथे ताजुद्दिन महाराज कीर्तन करीत असताना कीर्तना सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच त्यांनी व्यासपीठावरच आपला प्राण सोडला.