Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

किर्तन करतांना किर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांचे निधन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 28, 2021
in राज्य
0
किर्तन करतांना किर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख यांचे निधन

नंदुरबार | प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील जामदे येथे दि. २७ सप्टेंबर सोमवारी रोजी रात्री सप्ताहाचा सहावा दिवस सुरू होता. निरुपणाला सुरुवात झाली. यानंतर तुका म्हणे येथे भजन प्रमाण हे प्रमाणाचे चिंतन मांडत असतानाच किर्तनकार ताजुद्दिन महाराज शेख त्यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर ते खाली बसले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे हलविण्यात आले. मात्र, तोपर्यत त्यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगितले.किर्तनाच्या व्यासपीठावरच ताजुद्दिन महाराज शेख यांनी प्राण सोडले. त्यांच्या या निधनानंतर वारकरी संप्रदायामध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी शोकसंवेदना प्रकट केल्या आहेत.
जामदे ता. साक्री  या गावात गेल्या आठवड्यापासुन ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू होता. सकाळी ज्ञानेश्वरी पारायणानंतर रोज रात्री वेगवेगळ्या किर्तनकारांचा किर्तनाचा कार्यक्रम होत असे. दि. २७ सप्टेंबर सोमवारी रोजी सोमवारी रात्री सप्ताहाचा सहावा दिवस सुरू होता. निरुपणाला सुरुवात झाली. यानंतर तुका म्हणे येथे भजन प्रमाण हे प्रमाणाचे चिंतन मांडत असतानाच ताजुद्दिन महाराज शेख यांच्या छातीत दुखू लागले. यानंतर ते खाली बसले. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे हलविण्यात आले. मात्र, तोपर्यत त्यांची प्राणज्योत मालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या निधनानंतर जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे बोदलापुरी आश्रमावर त्यांचे पार्थिव पाठवण्यात आले. एका नामवंत किर्तनकारांचा किर्तनाच्या व्यासपीठावर झालेला शेवट खर्‍या अर्थाने सर्वत्र चर्चेचा विषय देखील ठरत आहे.ताजुद्दिन महाराज हे मुस्लिम समाजाचे असले तरी वारकरी संप्रदायाची जीवनशैली त्यांनी अंगिकारली होती. वारकरी संप्रदायात मुस्लिम समाजाचा कीर्तनकार म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा याबाबत त्यांनी सदैव जनजागृती केली. मूळचे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी गावचे रहिवाशी होते. गावासह पैठणमध्येही त्यांनी एक आश्रम सुरू केला. त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार-प्रचाराचे काम केले जाते. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात पहिलीच अशी घटना घडली की, कीर्तन करीत असताना कीर्तनकारांचा मृत्यू झाला. नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या साक्री तालुक्यातील जामदे येथे ताजुद्दिन महाराज कीर्तन करीत असताना कीर्तना सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच त्यांनी व्यासपीठावरच आपला प्राण सोडला.

बातमी शेअर करा
Previous Post

पाऊस न आल्यास नवरात्रीपासुन नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणी पुरवठा

Next Post

नंदुरबार शहरातील अंधारे चौकात भरधाव ट्रॅक्टर रुग्णालयाच्या भिंतीला धडकले, अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने चालकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

July 3, 2022
शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

July 3, 2022
राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

July 3, 2022
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

July 3, 2022
तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

तोरणमाळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील चार विद्यार्थी घेतले दत्तक

July 3, 2022

एकूण वाचक

  • 1,691,705 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group