Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

team by team
March 18, 2026
in राज्य
0
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

नंदुरबार l प्रतिनिधी-

आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सव शांततेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून पार पडावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात दुपारी ३ वाजता पार पडली.

बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. यांनी भूषविले. यावेळी जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शांतता समितीचे सुमारे १०० ते १५० सदस्य, तसेच प्रतिष्ठित नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः सणांच्या काळात सामाजिक सलोखा राखणे, अफवांवर विश्वास न ठेवणे, तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती आशा गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी  संजय महाजन (नंदुरबार),  दत्ता पवार (शहादा), सुभाष भोये (अक्कलकुवा), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी सर्वांनी एकत्रितपणे शांतता, सुव्यवस्था व सामाजिक ऐक्य राखण्याचा निर्धार व्यक्त केला.

बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

Next Post

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

Next Post
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add