Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना, 5 जणांचा मृत्यू

team by team
July 20, 2023
in राष्ट्रीय
0
इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना, 5 जणांचा मृत्यू

 

 

नंदूरबार l प्रतिनिधी

 

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे काल रात्री साडे दहाच्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ३० ते ४० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. याठिकाणी नेमके काय घडले याबाबतची याच गावातील ग्रामस्थांनी दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

 

इर्शाळगडाच्या आसपासच्या परिसरातदेखील जोरदार पाऊस सुरु आहे. या गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावामध्ये राहणारे काही गावकरी या पावसामध्येच मासेमारीसाठी गेले होते. मासेमारी केल्यानंतर गावकरी रात्री उशिरा आपल्या घराकडे परतत होते.साधारण ११ वाजेच्या सुमारास डोंगराचा काही भाग खचत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच डोंगराचा काही भाग इर्शाळवाडीतील घरांवर पडल्याचे त्यांना दिसले.

 

गावकऱ्यांनी वेळ न घालवता गावातील सरपंच आणि इतर गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीतात्काळ स्थानिक पोलीस आणि तहसील कार्यालयाला याची माहिती दिली.

या घटनेची माहिती कळताच इर्शाळवाडीमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपले नातेवाईक ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे सर्वांनी आक्रोश केला. रात्री १२.३० वाजता पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मदतकार्यासाठी एकापाठोपाठ एक सर्व पथक दाखल झाले. अग्निशमन दल, एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री २.४५ वाजता बचावकार्य सुरु केले.दिवसभर मदतकार्य सुरू होते.

 

या घटनेत आतापर्यंत सात जणांचे मृतदेह मलब्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला, पुरुष, लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक, पाळीव प्राणी ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. त्यांच्या वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

गायरान जमिनी संदर्भात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा,मुंबई येथे रेल्वेने रवाना

Next Post

इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

Next Post
इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

इर्शाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add