नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, नंदुरबार तर्फे व्हॉईस ऑफ नंदुरबार या करावोके खुली गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे ऑडिशन दि.१६ व २३ जुलै (रविवार) रोजी राजे शिवाजी माध्यमिक विद्यालय, शहादा रोड, नंदुरबार येथे होणार आहे.
स्पर्धेत दोन गट करण्यात आले असून लहान गटात १५ वर्षाआतील स्पर्धकांचा समावेश असेल, तर मोठ्या गटात १५ वर्षावरील स्पर्धकांचा समावेश राहणार आहे. ऑडिशन फेरीतील विजेत्यांची अंतिम स्पर्धा दि.३० जुलै २०२३, रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नंदुरबार येथे होईल. व्हॉईस ऑफ नंदुरबार ही स्पर्धा या वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील मोठ्या गटातील पहिल्या तीन विजेत्यांना ११००० रुपये, ७००० रुपये, ५००० रुपये, लहान गटातील विजेत्यांना ७००० रुपये, ५००० रुपये, ३००० रुपये किंमतीचे आकर्षक भेटवस्तू स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येतील. सदर स्पर्धा पारदर्शक व उच्च दर्जाची व्हावी, या उद्देशाने स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील संंगित क्षेत्रातील तज्ञ व नामवंत गायक परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेच्या नोंदणीसाठी यशतंत्र डिजिटल, आमदार कार्यालयासमोर नंदुरबार, राज कॉम्प्युटर, बालाजी वाड्यासमोर नंदुरबार या ठिकाणी संपर्क साधावा.
तसेच ऑडिशनच्या ठिकाणी देखील नोंदणी करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेणार्या स्पर्धकांनी ऑडिशनसाठी स्वतःचा करावोके ट्रॅक सोबत आणावयाचा आहे. अधिक माहितीसाठी ७०२०८३१६१७, ८८३०८७८०६४, ९४२३९४०६७४, ८०८७५१५३०९, ९९२३१२९७८२ या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त संगित प्रेमी स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरुद्दीन जलगुणवाला, सचिव आकाश जैन, प्रोजेक्ट चेअरमन नागसेन पेंढारकर, को-चेअरमन किरण दाभाडे, प्रा.राहुल मेघे, राहुल पाटील व रोटरी क्लब ऑफ नंदनगरीच्या सर्व पदाधिकार्यांनी केले आहे.








