नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या तीनसमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे यांनी भेट देऊन पाणी पुरवठा बाबत पाहणी केली.यामुळे पाण्याबाबत गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावंडे तथा पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता ज़ि प नंदुरबार ए.बालविकास प्र धडगाव तसेच संबंधीत खात्यातील अधिकारी यांनी अति दुर्गम भागातले धडगाव तालुक्यातील तीनसमाळ गावी भेट देऊन शिक्षण आरोग्य अंगणवाडी पाहिणी केली.मुलांचे प्रगती चे मूल्यमापन केले.अपेक्षित विंद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम बेसिक असमाधानकारक असल्याने विद्यार्थ्याची प्रगती साठी लक्ष देने संदर्भात मार्गदर्शन केले.
त्यानंतर उपकेंद्र अंगणवाडी भेट दिली त्या नंतर तीनसमाळ गावासाठी नर्मदे वरून पाईप लाईन करुन पाणी आणण्याचे तिन कोटींचा प्रोजेक्ट मंजूर असतांना रस्त्या अभावी टेंडर रद्द करण्यात आलेत हीं बाब लक्षात घेउन साहित्य वाहतुकीसाठी रोड तीनसमाळ ते सुरुंग नर्मदा तट रोड प्रस्तावित करण्यासंदर्भात सूचना केल्या.
ग्रामस्थांशी बसून विविध प्रश्न कसे सुटतील यावर चर्चा केली अनेक प्रश्नानी त्रस्त असलेल्या अशा दुर्गम गावास यापूर्वी ही चार जिल्हाधिकारी भेट देऊन गावाची पाहणी केली होती.प्रथम मुख्याधिकारी यांनी भेट दिल्याने काही प्रश्न मार्गी लागतील या अपेक्षा पोटी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी सामाजिक कार्यकते तानाजी पावरा, वसंत पावरा, दिलीप पावरा, सरपंच दिपक पावरा, गुलाबसिंग पावरा, जोरदार पावरा, जोहार फाउंडेशन लक्ष्मण पावरा आदी उपस्थित होते.








