नंदूरबार l प्रतिनिधी
मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ.10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला असून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागाळी ता.नवापूर जि.नंदुरबार येथील शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
प्रथम कु.योगेश्वरी देविदास कोकणी(86.80), द्वितीय कु.प्रतिभा छोटाभाई कोकणी (82.60), तृतीय कु.सरीता राकेश कोकणी (82.00) क्रमांक पटकावला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक पी.बी.बोरसे वर्गशिक्षक पी.पी.गावीत, लाजरस गावीत, गुलाबसिंग गावीत.श्रीमती एच.एन.मराठे व शाळेतील वर्ग-3, वर्ग-4 कर्मचा-र्यांनी अभिनंदन केले.








