Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी वेळेस काळजी घ्या, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

team by team
June 9, 2023
in राज्य
0
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी वेळेस काळजी घ्या,  कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

नंदूरबार l प्रतिनिधी
  खरीप हंगाम जवळ आला असून शेतकरी बियाणे खरेदी करत आहेत, मात्र बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक  टाळण्यासाठी कृषी विभागाकडून बियाणे खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्वक  वाणाची निवड कशी करावी याबाबत विभागीय कृषी सहसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी नंदुरबार यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे.
 *कपाशीचा  दाणा निवडताना कोरडवाहू किंवा बागायती लागवडीचा प्रकार व वाणाचे गुणधर्म यांचा विचार करावा.
*  सर्व प्रकारच्या हवामानास व जमिनीस अनुकूल वाण असावे.
* आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा.
*  वाऱ्यामुळे न पडणारे वाण असावे.
*  रसशोषण करणाऱ्या किडी व रोगांना सहनशील / प्रतिकारक्षम वाण असावा.
*  शेवटपर्यंत पाने हिरवी राहिल्यास अन्न तयार करण्याचे काम अखेरपर्यंत चालते. त्यामुळे उशिरा लागणाऱ्या बोंडांचा सुद्धा आकार मोठा राहतो व बोंडे फुटण्याचे प्रमाण वाढते.
*  बागायती लागवडीसाठी माध्यम ते उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.
*  बोंडांचा आकार बागायती लागवडीसाठी मोठा व कोरडवाहू लागवडीसाठी मध्यम असावा.
*  पाण्याचा ताण सहन करणारा वाण निवडावा. बोंडे चांगली फुटणारा व धाग्याची प्रत चांगली असणारा वाण निवडावा, त्यामुळे कपाशीला चांगला बाजारभाव मिळू शकेल.
*  वरील गुणधर्माप्रमाणे आपला मागील हंगामातील अनुभव तसेच आपण स्वतः इतर शेतकऱ्यांच्या शेतावरील पीक पाहून कपाशीच्या वाणाची निवड करावी.
          अधिक उत्पादन देणारे वाण बाजारात उपलब्ध असून त्यांचे त्या-त्या वाणाच्या गुणधर्मानुसार योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास निश्चितपणे चांगले उत्पादन मिळेल. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.
      शेतकऱ्यांनी कपाशीचा योग्य वाण निवडून खरेदी करून ठेवावे सध्या तापमान जास्त आहे 36 ते 38 सेल्सिअस तापमाना त शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करावी .                             
स्वप्निल शेळके.                   
 तालुका कृषी अधिकारी ,नंदुरबार
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात ४ लाख बीटी कापसाची पाकीट उपलब्ध, जादा दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाईचा ईशारा

Next Post

ढोंगसागाळी आश्रमशाळेचा दहावीचा 100 टक्के निकाल

Next Post
ढोंगसागाळी आश्रमशाळेचा दहावीचा 100 टक्के निकाल

ढोंगसागाळी आश्रमशाळेचा दहावीचा 100 टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add