Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१०० टक्के लसीकरण करणारी खेतिया नगरपरिषद मध्यप्रदेशात प्रथम

team by team
June 30, 2021
in आरोग्य
0
१०० टक्के लसीकरण करणारी  खेतिया नगरपरिषद मध्यप्रदेशात प्रथम

खेतिया ! प्रतिनिधी
बडवानी जिल्ह्यातील खेतिया नगरपरिषदेने कोरोना विषाणू सारख्या सुरू असलेल्या संघर्षात मशाल आणली. जिल्हा व राज्यात १०. टकके लसीकरण करणारी पहिली नगर परिषद असल्याचा मान मिळाला आहे. खेतिया शहराची कामगिरी आणखी महत्त्वाची ठरली आहे.कारण कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान हा भाग महाराष्ट्राशी जवळीक असल्यामुळे जास्त प्रभावित झाला होता. कारण इथला व्यवसाय, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणार्‍या लोकांची प्रक्रिया सुरूच होती. कोरोना विषाणूंपासून या भागातील रहिवाशांना वाचविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शक्य तितक्या लवकर १०० टक्के पात्र रहिवाशांना लसीकरण करणे आणि हे काम येथील नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांनी केले आहे. खेतिया येथील नागरिकांना हे समजले की खेतिया शहर हे कोरोना लसीकरण मोहिमेत प्रथम स्थानावर आहे, तात्काळ लोकांनी फटाके फोडून व एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त केला.
बडवानी जिल्हयाचे कोरोना प्रभारी मंत्री प्रेमसिंह पटेल, राज्यसभेचे खा.डॉ. सुमेरसिंग सोलंकी, लोकसभेचे खासदार गजेंद्रसिंग पटेल, जिल्हाधिकारी शिवराजसिंह वर्मा यांनी आनंद व्यक्त करताना खेतिया नगरमधील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, पत्रकार, आरोग्य विभाग,  प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना श्रेय दिले आहे. ज्यांनी सामूहिक प्रयत्नातून हे यश संपादन केले आणि जिल्ह्याचा मान वाढविला. उपलब्ध आकडेवारीनुसार खेतिया नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या १४०९५ आहे. यापैकी ४०८६ हे १८ वर्षाखालील रहिवासी आहेत. अशा प्रकारे येथे १०हजार ९ लोकांना लसी देण्यात येणार होती. बुधवार २३ जूनपर्यंत येथे १०१३६ लोकांना लस देण्यात आली होती. सर्वेक्षण करताना असे दिसून आले की, खेतिया नगरात १८ वर्षाच्या ९५३२ लोकांना लसीकरण झाले आहे. उर्वरित ४७७ लोक अशी आहेत की ज्यांना कोरोनामुळे प्रभावित झाल्यामुळे किंवा गर्भवती, दाई किंवा पलायन करून गेल्यामुळे लसीकरण करता आले नाही. या सर्वेक्षणात असेही समजले की, १२७ नागरिकांनी महाराष्ट्रातून किंवा जिल्ह्यातील इतर भागातील रहिवासी होते आणि त्यांनी खेतिया येथे लसी घेतल्या आहेत. खेतिया शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने प्रशासनाच्यावतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
फोटो – खेतिया शहरात १०० % लसीकरण पूर्ण करून जिल्ह्यातील व मध्यप्रदेशातील पहिले शहर ठरल्याने फटाके फोडून व मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त करतांना प्रशासकीय अधिकारी – कर्मचारी, नगरपरिषद खेतियाच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, नगरसेवक, परिषदेचे अधिकारी – कर्मचारी, खेतिया शहरातील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्ष, पत्रकार, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त, तळोदा व नवापूर तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर

Next Post

यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर झाल्याने यंदाही गणपती कारखान्यांमध्ये हजारो मोठ्या मुर्त्या पडुन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा मंगलारंभ

October 31, 2026
गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

October 31, 2026
दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

दिवाळी फराळाची चव पोहोचवा जगभर

October 31, 2026
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add