जिल्हयातील धडगांव नंतर आज अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. तर तळोदा व नवापूर तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत.
जिल्हयात काही दिवसांपुर्वी धडगांव तालुका कोरोनामुक्त झाला होता.आज परत अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. आतापर्यंत २ लाख १४ हजार ३५ संशयित रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ३७ हजार ६५९ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यापैकी ३६ हजार ६६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ९४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्हयातील २१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने अक्कलकुवा तालुका कोरोनामुक्त झाला आहे. या तालुक्यात दाखल असलेला कोरोनाचा अखेरचा एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. सद्यस्थितीत नंदुरबार तालुक्यात ३२, शहादा व तळोदा तालुक्यात प्रत्येकी ४ व नवापूर तालुक्यात ८ अशा एकुण ४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धडगाव तालुक्यात गेल्याच आठवडयात कोरोनामुक्त झाला होता. तळोदा व नवापूर तालुका कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत.