नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील भादे येथील जि.प.शाळेतून चोरट्याने ३७ हजाराचे विविध साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील भादे येथील जिल्हा परिषदेची शाळा आहे. सदर शाळेतील मुख्याध्यापक कार्यालयाच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. मुख्याध्यापक कार्यालयात असलेले ३७ हजार रुपये किंमतीची एक बॅटरी, इन्व्हर्टर, एलईडी टीव्ही व एम्लिफायर असे साहित्य चोरुन नेले. याबाबत भिकन नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पाटील करीत आहेत.