Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

team by team
March 10, 2026
in राष्ट्रीय
0
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

नंदुरबार l प्रतिनिधी-

माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार डॉ हिना गावित यांनी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे होणाऱ्या सिंहस्थ पर्वणी संदर्भात महत्त्वाची आढावा बैठक घेत प्रकाशातील विकास कामांविषयी चर्चा केली.

माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. शहादा तालुक्यातील प्रतिकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री नाशिक प्रमाणेच दर बारा वर्षानंतर अर्ध कुंभमेळा म्हणजे सिंहस्थ पर्वणी तापी काठावर भरवली जात असते. सिंहस्थ पर्वणी चा लाभ घेण्यासाठी मध्य पदेश गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातून शेकडोच्या संख्येने भाविक येत असतात. ही सिंहस्थ पर्वणी काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने तापी काठावरील घाट परिसरात पूर्वतयारीला वेग देण्यात आला आहे. तथापि हजारोच्या संख्येने भाविक येतात त्यावेळी त्यांच्यासाठी पुरेसे निवासस्थान, मंदिर परिसरातील रस्ते, गावांमधील पाणी नियोजन तसेच प्रकाशासह त्या मार्गावरील महत्त्वाचे रस्ते अशा स्वरूपाच्या सर्व विकास कामांना गती मिळणे अत्यावश्यक आहे; असे याप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले.

त्याचबरोबर शहादा तालुक्यात विविध विकास कामांच्या संदर्भाने येणाऱ्या अडचणी उपलब्ध निधी आणि मनुष्यबळ याची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्या माध्यमातून जे जे सहकार्य सिंहस्थ पर्वणीसाठी आवश्यक असेल ते मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू; असेही डॉक्टर हिना गावित यांनी बैठकीत सांगितले.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता कुणाल पटले, निवासी नायब तहसीलदार शैलेंद्र गवते, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा महेश पोद्दार सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा शाखा अभियंता दिलीप पाडवी, शाखा अभियंता जीवन कांडेकर, ग्रामविकास अधिकारी शहादा बी.जी. पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

Next Post

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

Next Post
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add