Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेत डल्ला मारणाऱ्या चौघांना पोलिसांनी केली मुद्देमालासह काही तासातच अटक, न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी

team by team
September 23, 2021
in क्राईम
0

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार  शहरातील मच्छी बाजार परिसरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेच्या कार्यालय फोडून चोरट्याने सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे बांधकामाचे विविध साहित्य लंपास केले होते.पोलीसांनी अवघ्या काही तासातच चौघा संशयीताना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना  न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. सदर कार्यालयाच्या आवारातील बंद असलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेच्या कार्यालयाची सिमेंटची खिडकी फोडून चोरट्याने आत प्रवेश केला. तसेच कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कलूप तोडून आत प्रवेश करीत १२ हजार रुपये किंमतीचा एक लोखंडी दरवाजा, २४०० रुपये किंमतीचे दोन फॅन, ८ हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रिक फिटींगेचे साहित्य, १० हजार रुपये किंमतीचे मातीचे परिक्षण करण्याचे मशीन व १ हजार रुपये किंमतीची खडी गाळण्याची चाळण असे असे एकूण ३३ हजार ८०० रुपये किंमतीचे बांधकामाचे साहित्य चोरुन नेले. याबाबत सुमित सतिषसिंग रघुवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 सदर गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे व पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर गुन्ह्याचे तपास अंमलदार पोहेकॉ  संदिप गोसावी यांना व गुन्हे शोध पथकाचे अमलदार यांना सदर गुन्ह्यातील गेले मालाचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी मार्गदर्शन केल्याने पोलीसांनी गुप्त बातमी मिळवुन चोरी प्रकरणी रुबाब अली अजगर अली सैय्यद,  जुबेर शहा हमीद शहा, अब्दुल रईस शेख सईद, शेख शोएब शेख फारुख सर्व रा.नंदुरबार यांनी अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीतांनी चोरी केलेला मुद्देमाल पैकी 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयीत आरोपीतांना न्यायालयाने  3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक  पी.आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक  विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे , पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल झाल्याचे काही तासांचे आत पोहेकॉ  संदिप गोसावी , पोहेकॉ  अतुल बिहाडे , पोना  भटु धनगर , पोकॉ विजय नागोडे , पोकॉ  इम्राण खाटीक , पोकॉ  राहुल पांढारकर , पोकॉ  विशाल मराठे , पोकॉ  हेमंत बारी यांनी कारवाई केली आहे .
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या अपघातात अक्कलकुवा तालुक्यातील दोन तर शहादा तालुक्यातील एका युवक युवक ठार

Next Post

भादे येथील जि.प.शाळेतून चोरट्याने ३७ हजाराचे विविध साहित्य लंपास

Next Post

भादे येथील जि.प.शाळेतून चोरट्याने ३७ हजाराचे विविध साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add