नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेच्या कार्यालय फोडून चोरट्याने सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे बांधकामाचे विविध साहित्य लंपास केले होते.पोलीसांनी अवघ्या काही तासातच चौघा संशयीताना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील मच्छी बाजार परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. सदर कार्यालयाच्या आवारातील बंद असलेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा चाचणी प्रयोग शाळेच्या कार्यालयाची सिमेंटची खिडकी फोडून चोरट्याने आत प्रवेश केला. तसेच कार्यालयाच्या मागील दरवाजाचे कलूप तोडून आत प्रवेश करीत १२ हजार रुपये किंमतीचा एक लोखंडी दरवाजा, २४०० रुपये किंमतीचे दोन फॅन, ८ हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रिक फिटींगेचे साहित्य, १० हजार रुपये किंमतीचे मातीचे परिक्षण करण्याचे मशीन व १ हजार रुपये किंमतीची खडी गाळण्याची चाळण असे असे एकूण ३३ हजार ८०० रुपये किंमतीचे बांधकामाचे साहित्य चोरुन नेले. याबाबत सुमित सतिषसिंग रघुवंशी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर गुन्ह्याचे तपास अंमलदार पोहेकॉ संदिप गोसावी यांना व गुन्हे शोध पथकाचे अमलदार यांना सदर गुन्ह्यातील गेले मालाचा व अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी मार्गदर्शन केल्याने पोलीसांनी गुप्त बातमी मिळवुन चोरी प्रकरणी रुबाब अली अजगर अली सैय्यद, जुबेर शहा हमीद शहा, अब्दुल रईस शेख सईद, शेख शोएब शेख फारुख सर्व रा.नंदुरबार यांनी अटक केली. त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीतांनी चोरी केलेला मुद्देमाल पैकी 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयीत आरोपीतांना न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक पी.आर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल झाल्याचे काही तासांचे आत पोहेकॉ संदिप गोसावी , पोहेकॉ अतुल बिहाडे , पोना भटु धनगर , पोकॉ विजय नागोडे , पोकॉ इम्राण खाटीक , पोकॉ राहुल पांढारकर , पोकॉ विशाल मराठे , पोकॉ हेमंत बारी यांनी कारवाई केली आहे .